Mumbai Crime News  
मुंबई/पुणे

Shocking: मुंबईत २२ मजली इमारतीवरून तरुणीनं मारली उडी; शरीराचे झाले दोन तुकडे

Mumbai Crime News: मुंबईच्या विक्रोळीमध्ये एक धक्कादायक घटना घडलीय. एका २५ वर्षीय तरुणीने इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केलीय.

Bharat Jadhav

मुंबईमध्ये एक धक्कादायक घटना घडलीय. एका २५ वर्षीय तरुणीने २२ मजली इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केलीय. जमिनीवर पडल्यानंतर तरुणीचे शरीराचे दोन तुकडे झाले. या घटनेमुळे विक्रोळी परिसरात खळबळ उडालीय.

प्राथमिक माहितीनुसार, इमारती उडी घेत आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव हर्षला तांदोलकर असं आहे. विक्रोळी कन्नमवार नगरमध्ये ही घटना घडलीय. २२ मजल्याच्या इमारतीवरून उडी घेतल्यानंतर तरुणीच्या शरिराचे दोन तुकडे झाले आहेत. यात या तरुणीचे दोन भाग झाले आहेत. घटनास्थळी विक्रोळी पोलीस ठाणे दाखल झाले असून या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत

स्थानिकांच्या माहितीनुसार, तरुणीने इमारतीच्या २२ व्या मजल्यावरील टेरेसवरून उडी मारली. उंचावरून पडल्यामुळे तिच्या शरीराचे दोन तुकडे झाले. स्थानिकांनी तत्काळ विक्रोळी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत घेतला आहे. प्राथमिक तपासात आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाहीये.

बारावीत कमी गुण मिळाल्याने जळगाव जिल्ह्यात दोघांची आत्महत्या

बारावी परीक्षेत यश मिळविले होते. मात्र अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. जळगाव जिल्ह्यात दोन विद्यार्थ्यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या.

अंगावर झाड पडलं, तरुणाचा मृत्यू

गेल्या २ दिवसांपासून पुण्यात मुसळधार पाऊस आहे. अनेक ठिकाणी झाड पडण्याच्या घटना घडत आहेत. अशातच पुण्यातील कर्वेनगर परिसरात असणाऱ्या समर्थ पथ या ठिकाणी असलेले एक झाड एका तरुणाच्या डोक्यावर पडल्यामुळे तो तरुण या घटनेत गंभीर जखमी झाला. उपचारासाठी त्याला रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

राहुल जोशी असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. जोशी हे सिंहगड रस्त्याला जाण्यासाठी कर्वेनगर परिसरातील समर्थ पथावरून जात होते, अचानक पावसामुळे कुजलेले झाड त्यांच्या डोक्यात पडले आणि यात त्यांचा मृत्यू झाला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पँटची चैन उघडली अन्..., ट्रेनमध्ये तरुणीकडे पाहून तरुणाचं अश्लील कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

Maharashtra Live News Update: अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या झाडाझडतीत एकाकडे सापडली पिस्तुल

Fake Charger: मोबाईल चार्जर खरे आहे का बनावट? खरेदी करताना ‘हे’ तपशील नक्की तपासा

Deepika Padukone Fitness: प्रेग्नेसीनंतर दीपिका पादुकोण इतकी फिट कशी? पाहा आताचे नवीन फोटो

Bank Rule: ग्राहकांना दिलासा! किमान बॅलेंस नसेल तरीही भरावा लागणार नाही दंड; या बँकांचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT