Mumbai Shoking News  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Shocking : मुंबई हादरली ! १५ वर्षीय मुलीवर जन्मदात्या वडिलांकडून बलात्कार, आईचाही समावेश

Mumbai Breaking News : मुंबईतील चारकोपमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. १५ वर्षीय तरुणीवर तिच्या सावत्र वडिलांनी बलात्कार केला असून तिच्या आईने तिच्यावर वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले आहे. या घटनेतील गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे.

Alisha Khedekar

चारकोपमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. १५ वर्षीय मुलीवर तिच्याच वडिलांनी बलात्कार केला आहे. याप्रकरणात तिच्या आईचाही समावेश आहे. तसेच या घटनेत एका रिक्षाचालकाचाही समावेश आहे. सदर पीडितेने केलेल्या फिर्यादीवरून या तिघांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी पीडित मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या आईने केली. खूप शोधाशोध केल्यानंतर पीडितेच्या मोबाईल नंबर वरून तिला शोधण्यात पोलिसांना यश आले. त्या मुलीला शोधण्यासाठी पोलिसांचे एक पथक नालासोपारा येथे पोहचले. तिथून तिला चौकशीसाठी आणले असता तिला रडू कोसळले आणि तिच्यावर होत असलेल्या अत्याचाराबद्दल तिने सांगितले.

पीडितेने सांगितल्यानुसार ती तिच्या आई आणि सावत्र वडिलांसोबत चारकोप येथे राहत होती. तिने पोलिसांना सांगितले की, तिच्या सावत्र वडिलांनी तिच्यावर ६ ते ७ महिन्यांत अनेकवेळा बलात्कार केला. तर आईने तिला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले. तिची आई तिला क्लायंट बुक करून द्यायची आणि वसई, विरार, या ठिकाणी हॉटेलवर पाठवायची. आणि त्यांच्याकडून १२०० रुपये घ्यायची. तसेच या दरम्यान एका रिक्षाचालकाने तिला वेगवेगळ्या हॉटेलमध्ये घेऊन जात तिच्यावर बलात्कार केला. या सगळ्या घटनेने घाबरलेली पीडित मुलगी मैत्रिणीच्या घरी लपून बसलेली होती.

दरम्यान पीडितेच्या या तक्रारीवरून पोलसांनी तिच्या आईला, सावत्र वडिलांना आणि संबंधित रिक्षा चालकाला ताब्यात घेतलं आहे. त्यांच्यावर बलात्कार, पॉक्सोसह बीएनएसच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या तिघांना न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cyber Crime : शेअर मार्केटमध्ये नफा देण्याचे दाखवत २५ कोटींची फसवणूक; दीडशेहून अधिक नागरिकांनी केली गुंतवणूक

मोठी बातमी! सिडकोच्या घरांच्या किमती कमी होणार? मुख्यमंत्री महत्त्वाचा निर्णय घेणार

Maharashtra Live News Update: - लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात

Maharashtra Flood: मदत नाही मिळाली तर शिक्षण सोडून गावी जावं लागेल, पुण्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची मांडली व्यथा

Voter ID साठी आधार आणि मोबाईल नंबर आवश्यक; निवडणूक आयोगाकडून नियमात मोठा बदल

SCROLL FOR NEXT