Mumbai Crime saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime: बायकोला भेटायला निघालेल्या पतीचा प्रियकराने वाटेतच काढला काटा! पोलीसांसमोर धक्कादायक कबुली

Mumbai News: कांदिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेश नगर लालजीपाडा परिसरात सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याचा संदेश पोलिसांना प्राप्त झाला.

Chandrakant Jagtap

>> संजय गडदे, साम टीव्ही

Mumbai Murder : अनैतिक संबंधास अडथळा ठरणाऱ्या पतीची पत्नीच्या प्रियकराने गोळ्या घालून हत्या केल्याची घटना रविवारी मुंबईच्या कांदिवली परिसरात घडली. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी अवघ्या 24 तासात खुनी प्रियकरास उत्तर प्रदेशातून वेड्या ठोकल्या आहेत. रोहित पाल असं खुनी प्रियकाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांदिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेश नगर लालजीपाडा परिसरात सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याचा संदेश पोलिसांना प्राप्त झाला. तात्काळ कांदिवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाला सुरुवात केली.

या तपासात मनोज लालचंद चव्हाण (32 वर्ष) यास अज्ञात व्यक्तीने गोळीबार करून ठार मारल्याचे निष्पन्न झाले. मयताचा भाऊ हरीकेश लालचंद चौहान याचे तक्रारीवरून अज्ञात इसमाविरूध्द कलम ३०२ भादवि सह कलम ३, २५ भाहका अन्य दाखल करण्यात आला.

गुन्ह्यातील अज्ञात खुनीचा शोध घेण्याच्या दृष्टीने मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ - ११ अजयकुमार बसंल यांचे मार्गदर्शनाखाली तपासपथकांची नेमणुक करण्यात आली. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक बाबी व परिसरातील नागरिकांकडून माहिती घेऊन गुन्हा हा मयत तरुणाच्या पत्नीचा प्रियकर रोहित चंद्रशेखर पाल (२३ वर्ष) प्रयागराज, उत्तरप्रदेश याने केला असल्याचे निष्पन्न झाले.

त्याचा शोध घेण्याकरीता उ. प्रा. विभागातील सर्व गुन्हे प्रकटीकरण पथक हे सर्व रेल्वे स्थानकावर नेमण्यात आले. आरोपी पवन एक्सप्रेस ने प्रवास करत असल्याचे समजतात पोलिसांनी एक टीम उत्तर प्रदेशला पाठवून स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपी रोहित पाल यास प्रयाग्रज रेल्वे स्थानकातून ताब्यात घेतले. (Latest Political News)

गोळीबारात मृत्यू पावलेला व्यक्तीची पत्नी ही आरोपीची प्रेयसी असून मनोज चौहान (मयत) हा तिला भेटण्याकरीता उत्तरप्रदेश येथे येणार असल्याने तो येण्यापुर्वीच आरोपीने मुंबईमध्ये येवुन त्यास ठार मारले असे आरोपीने कबूल केले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Garam Pani Kund In Mandla History: बापरे चमत्कारच! बाराही महिने गरम पाणी वाहणारं हे कुंड नेमकं आहे तरी कुठे?

Pune : पुण्यातील नामंकित कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची रॅगिंग; ५ जणांवर गुन्हा

मुंबईहून १६६ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानात तांत्रिक बिघाड; भोपाळमध्ये केलं एमर्जन्सी लँडिग

Maharashtra News Live Update: मुंबई-गोवा महामार्गावर भोस्ते घाटात टेम्पो ट्रँव्हलर बसचा अपघात

लग्नाचं वचन देऊन Bigg Boss फेम अभिनेत्रीने 9 कोटींना लुटले; NRI तरुणाचा गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT