Mankhurd Friring CCTV Footage
Mankhurd Friring CCTV Footage saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime: शेजाऱ्यांसोबतचा वाद जीवावर बेतला! बाप-लेकाकडून महिलेवर अंधाधुंद गोळीबार; घटना CCTVत कैद

Chandrakant Jagtap

Mankhurd Friring CCTV Footage: मुंबईच्या मानखुर्दमध्ये शेजाऱ्यांसोबतचा वाद एका महिलेच्या जीवावर बेतला आहे. किरकोळ वाद झाल्यानंतर संतप्त झालेल्या शेजाऱ्याने महिलेवर गोळी झाडून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. मानखुर्द भागात झालेल्या या गोळीबारात फरजाना इरफान शेख नावाच्या महिलेचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी शेजारी दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन कुटुंबातील भांडणानंतर हा गोळीबार झाला. या गोळीबारात महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र या घटनेचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. खुनाचा गुन्हा दाखल करून पोलीस दोन्ही आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांच्या हाती लागले आहे. यात आरोपी महिलेच्या घरात घुसून तिच्यावर गोळीबार करत असल्याचे दिसत आहे.

डीसीपी हेमराज सिंह राजपूत यांनी सांगितले की, मानखुर्द परिसरात शेजारी राहणाऱ्या दोन कुटुंबातील महिलांमध्ये भांडण झाले. यातील एका महिलेच्या पती आणि मुलाने दुसऱ्या महिलेवर गोळीबार केला यात तिचा मृत्यू झाला. आम्ही दोन्ही आरोपींची ओळख पटवली आहे आणि त्यांना पकडण्यासाठी शोध सुरू आहे. (Latest Mumbai News)

मानखुर्द झालेल्या या गोळीबाराच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) समोर आले आहे. यात दोन्ही आरोपी महिलेवर हल्ला करताना दिसत आहे. आरोपी असलेले पिता-पुत्र दोघे महिलेवर हल्ला करत असल्याची घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. या फुटेजमध्ये महिलेवर कसा हल्ला झाला स्पष्टपणे दिसत आहे. मानखुर्द पोलिसांनी याप्रकरणी हल्ला करणाऱ्या बाप-लेकावर गुन्हा दाखल केला. सोनू सिंग (वय 55 वर्षे) आणि त्याचा मुलगा अतीश सिंग (वय, 25 वर्षे) हे दोघे फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tomato Side Effects: या लोकांनी टोमॅटो खाणे आरोग्यासाठी घातक

Amol Mitkari On Sharad Pawar: तुमच्या मनात नेमकं काय होतं?, शरद पवारांच्या त्या विधानावर अमोल मिटकरी संतापले

Lal Salaam Released In Hindi : रजनीकांत यांचा 'लाल सलाम' हिंदीमध्ये पाहायला मिळणार, कधी आणि कुठे होणार रिलीज?

Today's Marathi News Live: चिपळूण तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस, नदी, नाले तुडूंब

Pune Crime: प्रेयसीने संपर्क तोडला, प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या; धक्कादायक घटनेने पुणे हादरलं!

SCROLL FOR NEXT