Mumbai Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगारांना लाखोंचा गंडा; मालवणी पोलिसांकडून ५ जणांना अटक

Mumbai Crime News: नोकरी देण्याचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगारांना गंडा घालणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या टोळीचा पर्दाफाश मुंबईच्या मालवणी पोलिसांनी केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

संजय गडदे, साम टीव्ही

Mumbai Crime News: दिल्लीत बसून एअपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया, एअर एशिया, रिलायन्स, जिओ अशा नामांकित कंपनीत नोकरी देण्याचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगारांना गंडा घालणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या टोळीचा पर्दाफाश मुंबईच्या मालवणी पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी मालवणी पोलीसांनी 5 जणांना अटक केली असून त्यांच्याकडून 15 मोबाईल, लॅपटॉप,विविध कंपन्यांची सिम कार्ड आणि बँकांची क्रेडिट कार्ड जप्त केली आहेत.

संतोषकुमार रतनसिंग कामती (वय 33 वर्षे),आकाश श्रीपाल यादव (वय 23 वर्षे), अल्ताफ हुसेन अब्दुल मन्नान (वय 23 वर्षे), चंदासिंग राजेश राय (वय 40 वर्षे) आणि हेमलता गौरीशंकर राठोर (वय 36 वर्षे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत.

या सर्व आरोपींविरोधात कलम 419,420,467,468,471,120 (b) भा.द. वि.सह कलम 66 (ड ) माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मालाड मालवणी परिसरात राहणारे विजय पवार यांना एअरपोर्ट येथील ग्राउड स्टाफ करीता नोकरी देण्याचे आमिष दाखवले.

यासाठी त्यांच्याकडून रुपये 2,45,600 विविध बँक खात्यामध्ये मागवून घेतले. मात्र, विजय यांना कोणतीही नोकरी मिळाली नाही.यामुळे आर्थिक फसवणूक झाली म्हणून विजय पवार यांनी मालवणी पोलीस ठाणे येथे येऊन तक्रार नोंदवली. यानुसार आरोपींविरोधात कलम 419,420,467,468,471,120 (b) भा.द. वि.सह कलम 66 (ड ) माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला

या गुन्ह्याचा तपास करताना मालवणी पोलिसांनी गुन्ह्यातील फसवणुक झालेली रक्कम वळवण्यात आलेल्या बँक खात्याची माहिती गोळा बँक खाते धारकास त्याचे राहते घरी फरीदाबाद, हरियाणा येथुन ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी करुन दोन आरोपीना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडे अधिक चौकशी करुन सनलाईट कॉलनी, दिल्ली येथे सापळा रचून कॉलिंग करणाऱ्या इतर तीन आरोपीना रेड हॅन्ड ताब्यात घेतले. सध्या या आरोपींच्या टोळीने मुंबई शहरात किती लोकांना गंडा घातलेला आहे, या टोळी मध्ये आणखी काही सदस्य आहेत का या सर्व विषयी अधिक तपास मालवणी पोलीस करत आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CP Radhakrishnan : सी. पी. राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती; 'इतक्या' संपत्तीचे आहेत मालक

Girls Education: उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना दरमहा २ हजार! लगेचच जाणून घ्या योजनेची संपूर्ण माहिती

Vice President Election: सीपी राधाकृष्णन भारताचे १७ वे उपराष्ट्रपती, इंडिया आघाडीचे सुदर्शन रेड्डी पराभूत

Asia Cup 2025 : संजू सॅमसनचं काय होणार? कॅप्टन सूर्यकुमार यादवने दिलं कडक उत्तर, अशी असेल भारताची प्लेइंग इलेव्हन

Maharashtra Live News Update: सी.पी. राधाकृष्णन भारताचे नवे उपराष्ट्रपती

SCROLL FOR NEXT