Washim Crime News: प्रेमसंबंधाला कुटुंबियांचा विरोध! प्रेमी युगुलाने उचललं टोकाचं पाऊल; हृदयद्रावक घटना

Washim Crime News: वाशिम जिल्ह्यातून एक भयानक घटना समोर आली आहे. वाशिमच्या मालेगाव तालुक्यात एका प्रेमीयुगुलाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
Washim Crime News
Washim Crime NewsSaam TV

मनोज जैस्वाल, साम टीव्ही

Washim Crime News: वाशिम जिल्ह्यातून एक भयानक घटना समोर आली आहे. वाशिमच्या मालेगाव तालुक्यात एका प्रेमीयुगुलाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. जऊळका पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या उमदरी वनपरिक्षेत्रात ही धक्कादायक घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत प्रेमीयुगाचे मृतदेह ताब्यात घेतले. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. (Breaking Marathi News)

Washim Crime News
Dombivali Crime News: संतापजनक! आई कामानिमित्त बाहेर गेली, नराधमाने भावासमोरच बहिणीला खोलीत खेचलं अन्...

लक्ष्मी ठाकरे (वय 20 वर्ष रा.कुत्तरडोह) महादेव लोखंडे (वय 23 वर्ष रा कवरदरी) अशी मृत प्रेमीयुगालाची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मी आणि महादेव हे दोघेही वाशिम जिल्ह्यातील असून गेल्या काही वर्षांपासून त्यांचे एकमेकांवर प्रेम होते. मात्र, दोघांच्याही प्रेमाला कुटुंबियांचा विरोध होता.  (Latest Marathi News)

वारंवार विनंती करून सुद्धा कुटुंबिय त्यांच्या प्रेमाची मागणी मान्य करत नसल्याने शेवटी दोघांनाही घर सोडण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांपूर्वी लक्ष्मी आणि महादेव कुणालाही न सांगता घरातून निघून गेले. दोघेही पळून गेल्याचं समजताच, कुटुंबियांनी पोलिसांत धाव घेतली.

Washim Crime News
Beed Accident News: आनंदाने लग्नासाठी निघाले, पण वाटेतच मृत्युने गाठलं; कारच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू

दोघेही पुण्याला गेले असल्याची तक्रार कुटुंबियांकडून पोलिसांत (Police) करण्यात आली. दरम्यान, पोलिस लक्ष्मी आणि महादेव यांचा शोध घेत होते. मात्र, आज पहाटेच्या सुमारास दोघांचेही मृतदेह मालेगाव तालुक्यातील जऊळका पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या उमदरी वनपरिक्षेत्रातील जंगलात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.

दरम्यान, स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोघांचेही मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदानासाठी पाठवले आहेत. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे. घटनेचा अधिक तपास जऊळका पोलीस स्टेशन पोलीस अधिकारी करत आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com