Mumbai News AI
मुंबई/पुणे

Mumbai : बड्या मंत्र्यांसोबत फोटो, स्मार्ट व्हिलेजमध्ये गुंतवणुकीचे आमिष; डॉक्टरने व्यवसायिकाला 1.13 कोटींना गंडा घातला

Mumbai News : मुंबईत ‘स्मार्ट व्हिलेज’ प्रकल्पाच्या नावाखाली 1.13 कोटींची फसवणूक उघड. बोरिवली पोलिसांनी आरोपीला अटक केली असून तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • ‘स्मार्ट व्हिलेज’ प्रकल्पाच्या नावाखाली फसवणूक

  • 1.13 कोटी रुपयांचा आर्थिक गंडा

  • बोरिवली पोलिसांनी आरोपीला अटक केली

  • बनावट कागदपत्रे आणि आमिष दाखवून फसवणूक

संजय गडदे, मुंबई

मुंबईत ‘स्मार्ट व्हिलेज’ प्रकल्पाच्या नावाखाली मोठी आर्थिक फसवणूक उघडकीस आली आहे. एका व्यावसायिकाची तब्बल 1 कोटी 13 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार बोरिवली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. बोरिवली पोलिसांनी आरोपीला आता अटक देखील केली आहे. डॉ.साजिद सय्यद असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

देवेशानंद शिरोडक स्पीडकॉम इंटरनेट सर्विसेस कंपनीचे संचालक, यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, डॉ. साजिद सय्यद यांनी स्वतःला “भारत CSR नेटवर्क”चा अध्यक्ष असल्याचे सांगून ‘स्मार्ट व्हिलेज’ प्रकल्पात गुंतवणुकीचे आमिष दाखवले. गोव्यात सरकारच्या सहकार्याने मोठा प्रकल्प सुरू असल्याचा विश्वास त्यांनी निर्माण केला.

प्रकल्पात सहभागी होण्यासाठी सुरुवातीला 50 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. शिरोडकर यांनी विश्वास ठेवून ही रक्कम दिली. त्यानंतर आरोपीने गोव्यातील मंत्री व सरकारी अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीचे फोटो-व्हिडिओ दाखवून प्रकल्प खरा असल्याचे भासवले.

आरोपीच्या सांगण्यावरून फिर्यादीने गोव्यात इंटरनेट हॉटस्पॉट सेवा सुरू केली तसेच मुंबईत फायबर टाकून CCTV बसवण्याचे कामही केले. या सर्व कामासाठी सुमारे 63 लाख रुपयांचा अतिरिक्त खर्च झाला. मात्र काम पूर्ण करूनही आरोपीने कोणतेही पैसे दिले नाहीत.एकूण 1.13 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शिरोडकर यांनी पोलिसांत धाव घेतली. आरोपीने बनावट कागदपत्रे देऊन प्रकल्प अधिकृत असल्याचा आभास निर्माण केल्याचाही आरोप आहे.

पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून, आरोपीने इतरांनाही अशाच प्रकारे फसवले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे ‘CSR’ आणि सरकारी प्रकल्पांच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीबाबत सावध राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावतीच्या अनेक भागात अवकाळी पावसाची दमदार हजेरी

Honey Bee: मधमाशी चावल्याने मृत्यू होतो? नेमकं सत्य काय?

Swara Bhasker: 'माझ्या शरीरावर फक्त माझाच अधिकार...'; वजन वाढल्यामुळे ट्रोल झालेल्या स्वरा भास्करने ट्रोलर्सची केली बोलती बंद

एक दिवसाची सुट्टी घेतली नंतर आलेच नाहीत; साडेतीन महिन्यांपासून IPS अधिकारी बेपत्ता, पोलीस प्रशासनात खळबळ

Dombivli Tourism : उन्हाळी ट्रिपसाठी बजेट कमी आहे? मग डोंबिवलीजवळील 'ही' ५ हिल स्टेशन फिराच, मनाली-काश्मीर विसराल

SCROLL FOR NEXT