Mumbai Crime x
मुंबई/पुणे

Mumbai Crime : चेंबूरमध्ये थरार! फक्त १,००० रुपयांसाठी ४४ वर्षीय बॅडमिंटन कोचवर जीवघेणा हल्ला, बिअर बाटली फोडली अन्...

Mumbai Crime News : चेंबूरमध्ये एका बॅडमिंटन कोचवर प्राणघातक हल्ला झाला. दर आठवड्याला हजार रुपयांची खंडणी देण्यास कोचने नकार दिला होता. यामुळे आरोपींनी त्याच्यावर हल्ला केला.

Yash Shirke

  • चेंबूरमधून धक्कादायक घटना समोर

  • हजार रुपयांसाठी बॅडमिंटन कोचवर प्राणघातक हल्ला

  • बिअर बाटली फोडून केले सपासप वार

Mumbai : मुंबईतील चेंबूरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खंडणी देण्यास नकार दिल्याने एका ४४ वर्षीय बॅडमिंटन कोचवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. शरीरावर अनेक वार झाल्याने पीडित व्यक्तीला सायन रुग्णालयात नेण्यात आले. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी शोधमोहिम सुरु केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चेंबूरच्या प्रबुद्धनगरमधील बाबासाहेब एसआरए इमारतीजवळ काल (३ ऑगस्ट) रात्री उशिरा ही घटना घडली. बॅडमिंटन कोच प्रफुल्ल घटविसावे हे घराबाहेर एका मित्रासोबत गप्पा मारत होते तेव्हा तिघांनी प्रफुल्ल यांच्यावर हल्ला केला. आरोपींनी प्रफुल्ल यांच्या हातातील सोन्याचे ब्रेसलेट हिसकावून घेतले.

आरोपींनी स्वत:ची ओळख सनी गँगचे सदस्य अशी करुन दिली. तिघांनी प्रफुल्ल घटविसवे यांच्याकडे खोलीच्या भाड्यातून दर आठवड्याला १००० रुपये खंडणी म्हणून देण्याची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपींनी सोन्याचे ब्रेसलेट हिसकावत प्रफुल्ल यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. भांडणाच्या वेळी तुटलेल्या बिअरच्या बाटलीने प्रफुल्ल यांच्या पोटावर अनेक वार करण्यात आले.

हल्ला केल्यानंतर तिन्ही आरोपी पळून गेले. या घटनेनंतर पोलिसांनी सनी भोसले (३०), सनी बुचुडे (३२) आणि विकास खेत्रे (२८) या तिघांवर आयपीसी कलम ३०७ (खूनाचा प्रयत्न), ३८६ (खंडणी) आणि भारतीय दंड संहितेच्या इतर संबंधित कलमांखाली एफआयआर दाखल केला आहे. तिन्ही फरार आरोपींना शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Maharashtra News Live Update: नवनाथ वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT