Mumbai Latest News SAAM TV
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: किरकोळ वादातून मित्राची निर्घृण हत्या! आधी चाकूने भोकसलं नंतर डोक्यात हातोडा घातला

Mumbai Latest News : कडिया काम करणाऱ्या दोन मित्रांच्या किरकोळ भांडणातून एकाचा खून झाल्याची घटना घडली आहे.

Chandrakant Jagtap

>> संजय गडदे, साम टीव्ही

Borivali Crime News: किरकोळ वादातून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना बोरिवली पूर्व देवीपाडा परिसरात घडली आहे. कडिया काम करणाऱ्या एका मित्राने दुसऱ्या मित्राला आधी चाकूने भोकसलं आणि नंतर त्याच्या डोक्यात हातोडा मारून त्याला ठार केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

कडिया काम करणाऱ्या दोन मित्रांच्या किरकोळ भांडणातून एकाचा खून झाल्याची घटना घडली आहे. यात अजित कुमार सहानी (33 वर्ष) याचा राम पुकार सहानी (३० वर्षे ) याने हातोडा मारून खून केला. या प्रकरणी मृत तरुणाच्या भावाने तक्रार दिल्यानंतर आरोपी रामप्रकाश सहानी यास कस्तुरबा मार्क पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बोरिवली पूर्वेकडील देवीपाडा परिसरात कडिया काम करणारे उत्तर प्रदेश मधील 10 तरुण एकत्र राहत होते. यातील मयत तरुण आणि आरोपी यांच्यात नेहमीच किरकोळ वादावादी होत असे. शुक्रवारी रात्री देखील त्या दोघांमध्ये अशीच वादावादी झाली.

"तू हमेशा कडियाही रहेगा, मिस्त्री कभी भी नही बन सकता" असे राम पुकार सहानी याने अजितकुमार सहानी याला चिडवले. यावरुन नंतर दोघांमध्ये वाद झाला. या वादात झालेल्या झटापटीत रामपुकार सहानी याने आधी अजितकुमारवर चाकूने वार केले. त्यावेळी अजितकुमार याने स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न केल्याने आरोपी राम कुमार सहानी याने अजितकुमारच्या डोक्यात हातोडा मारून त्याला ठार केले. (Crime News)

यानंतर घडलेल्या या गुन्ह्यासंदर्भात आरोपी आणि त्याच्या इतर साथीदारांनी पोलिसांना न कळवता उत्तर प्रदेश येथील नातेवाईकांना कळवले. नातेवाईकांनी मयत तरुणाच्या मुंबईतील भावाला फोन करून यासंदर्भात माहिती दिली. यानंतर मयत तरुणाच्या भावाने कस्तुरबा मार्ग पोलिसांना या संदर्भात तक्रार दिली. या तक्रारीनंतर कस्तुरबा मार्ग पोलीस ठाणे येथे कलम ३०२ भादवि कलम ३७ (१) (अ), १३५ मपोका अन्वये नोंद करण्यात आला. पोलिसांनी आरोपी रामपुकार सहानी याला देवीपाडा परिसरातून अटक केली. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुणे मनपा प्रभाग रचना,२०२५ मध्येही ४ सदस्यांचा प्रभाग कायम | VIDEO

Maharashtra Live News Update : शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनाला राज ठाकरेंची हजेरी असणार

RVNL Recruitment: रेल विकास निगम लिमिटेडमध्ये सरकारी नोकरीची संधी; पगार २ लाख रुपये; आजच अर्ज करा

Artificial Intelligence: दररोज ChatGPT कडे किती प्रश्न विचारले जातात? ऐकून तुम्ही थक्क व्हाल

मोठी बातमी! शिवसेना ठाकरे गटातील नेत्यानं उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरात आयुष्य संपवलं

SCROLL FOR NEXT