Baba Siddique Death Update: Saamtv
मुंबई/पुणे

Baba Siddique Death: 'दोघांना संपवा...', बाबा सिद्दीकींसह झिशान सिद्दीकीही टार्गेटवर, एका फोनमुळे प्लॅन फसला!

Gangappa Pujari

सचिन गाड, मुंबई

Baba Siddique Death: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची मुंबईमध्ये गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयासमोरच बाबा सिद्दीकी यांच्यावर दोघांकडून गोळ्या झाडण्यात आल्या. या प्रकरणात तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर आरोपींच्या चौकशीत खळबळजनक खुलासा झाला असून बाबा सिद्दीकी यांच्यासह मुलगा झिशान सिद्दीकी यांच्याही हत्येची सुपारी आरोपींना देण्यात आल्याचे समोर आले आहे.

राष्ट्रवादीचे काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री तीन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. बाबा सिद्दीकी यांच्यासोबत मुलगा झिशान सिद्दीकीही घटनेवेळी हजर होते. दोघेही बाप- लेक ऑफिसमधून बाहेर पडाले, मात्र फोन आल्याने झिशान सिद्दीकी पुन्हा कार्यालयात गेले. इतक्यात हल्लेखोरांनी बाबा सिद्दीकींना लक्ष्य केले. त्यामुळे तो फोन आला नसता तर झिशान सिद्दीकी यांनाही टार्गेट करण्याचा उद्देश होता, अस संशय व्यक्त केला जात होता. याबाबतच आता आरोपींच्या चौकशीत महत्वाचा खुलासा झाला आहे.

नुकतेच मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला आरोपींकडून एक मोठी गोष्ट समोर आली. आरोपींनी खुलासा केला आहे की बाबा सिद्दीकी सोबत त्यांचा मुलगा झीशान सिद्दीकी देखील हल्लेखोरांच्या निशाण्यावर होता. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी सांगितले की, आरोपींना झीशान आणि बाबा सिद्दीकी या दोघांना मारण्याची सुपारी देण्यात आली होती. कारण आमदार झिशान सिद्दीकी ही लॉरेन्स बिश्नोई टोळीचे लक्ष्य होते. दोघांना एकत्र मारायचे अन्यथा जो समोर दिसेल त्याला संपायचे अशी सुपारी मिळाल्याचं चौकशीत समोर आले आहे

दरम्यान, बाबा सिद्दिकी हत्ये प्रकरणी अटक करण्यात आलेल्या धर्मराज कश्यपने अल्पवयीन असल्याचा दावा केला होता, मात्र त्याचा हा डाव फसला. रविवारी कोर्टात हजर केलं असता कश्यपने तो १७ वर्षीय आल्याचा दावा केला होता. या दाव्यानंतर कश्यपची ऑस्सफिकेशन चाचणी करण्याचे कोर्टाने निर्देश दिले होते. या ऑस्सफकेशन चाचणीत कश्यप अल्पवयीन नसल्याचे निष्पन्न झाले. कश्यप अल्पवयीन नसल्याचे निष्पन्न होताच रात्रीच्या वेळेस त्याला कोर्टात हजर करण्यात आले असून २१ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : काँग्रेसला मोठा धक्का; आमदार हिरामण खोसकर यांचा अजित पवार गटात प्रवेश

Women T20 World Cup: पाकिस्तानच्या पराभवाने भारताच्या स्वप्नांवर पाणी; टीम इंडिया T20 वर्ल्ड कपमधून बाहेर

Toll-free entry in Mumbai : मुंबईकरांना टोलमाफीचं गिफ्ट; कोणत्या टोलनाक्यावर हलक्या वाहनांना 'टोल फ्री'? VIDEO

Maharastra Politics : अजित पवारांना मोठा धक्का; संजीवराजे,दीपक चव्हाणांच्या हाती तुतारी, आता फलटणमध्ये गणित काय? VIDEO

Maratha Reservation: जरांगेंचा इशारा, सरकारचं दुर्लक्ष; विधानसभेलाही आरक्षणाचा मुद्दा पेटणार

SCROLL FOR NEXT