Mumbai Crime News: Saamtv
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: दुचाकी पार्किंग करण्यावरून वाद.. दोन गटात तुफान हाणामारी; चौघांना अटक

Kandivali News: याप्रकरणी कांदिवली पोलीस ठाण्यात दोन्ही गटात विरोधात गुन्हा दाखल झाला असून चौघांना अटक करण्यात आली आहे.

Gangappa Pujari

संजय गडदे, प्रतिनिधी...

Mumbai Crime News: मुंबईच्या कांदिवली पश्चिमेकडील संजय नगर, लालजी पाडा भागात दुचाकी पार्किंग करण्याच्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ प्रचंड वायरल झाला असून याप्रकरणी कांदिवली पोलीस ठाण्यात दोन्ही गटात विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. (Crime News In Marathi)

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, संजयनगर (Sanjay Nagar) परिसरात राहणारा तरुण शर्मा आपली दुचाकी पार्किंग करत असताना संदीप चव्हाण याने वाहन पार्किंग करण्यास मनाई केली. यातून दोघांमध्ये वाद झाला. हा वाद टोकाला जावून दोघांमध्ये हाणामारी सुरू झाली.

यावेळी तरुण शर्मा आणि त्याच्या साथीदारांनी संदीप चव्हाण यांच्या कारखान्यातील लोखंडी रोड घेऊन संदीप चव्हाण यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात संदीप चव्हाण रक्तबंबाळ झाला. धक्कादायक बाब म्हणजे हे भांडण सोडवण्यासाठी आलेल्या दोन्हीकडच्या नातेवाईकांनादेखील मारहाण झाली. ज्यामध्ये अनेक जण जखमी झाले.

यातील काही जणांवर पालिकेच्या शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी दोन्ही गटाविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच चौघांना अटक करण्यात आली आहे. तरुण वंशराज शर्मा (35 वर्ष) शुभम ब्रिजेश शर्मा (19 वर्ष) पवन जिलाशीत चौहान (35 वर्ष) आणि संदीप शिवबच्चन चौहान (22 वर्ष) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nepal Prime Minister K.P. Sharma Oli resigns : नेपाळमध्ये सत्तापालट; पंतप्रधान ओलींचा राजीनामा

Maharashtra Live News Update: राष्ट्रवादी काँग्रेसचे नागपूरात राज्यस्तरीय एकदिवसीय चिंतन शिबिराचे आयोजन

RBI Recruitment: रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी; ऑफिसर पदासाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

Koli Community : कोळी समाजाला हैदराबाद गॅजेट लागू करा; महादेव, मल्हार कोळी समाज आक्रमक

गोकुळचा मोठा निर्णय! लवकरच चीज अन् आईस्क्रीम बाजारात आणणार; शेतकऱ्यांनाही दिलासा

SCROLL FOR NEXT