Mumbai News
Mumbai News Saamtv
मुंबई/पुणे

Vasai News: नववर्षाच्या पूर्वसंधेला मोठी कारवाई; १ करोड ४७ लाखांचे ड्रग्ज जप्त; २ जण ताब्यात

चेतन इंगळे

Vasai Crime News:

अंमली पदार्थ विरोधी पथकाने नवीन वर्षाच्या पुर्वसंध्येला १ करोड ४७ लाखांचे ड्रग्ज पकडल्याने वसईत खळबळ माजली आहे. नालासोपाऱ्याच्या प्रगतीनगर परिसरात शुक्रवारी (२९, डिसेंबर) ही कारवाई करण्यात आली. यामध्ये दोन नायजेरियन नागरिकांना अटक केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी दिली आहे.

नववर्षाच्या स्वागतासाठी मिरा-भाईदर, वसई-विरारमध्ये (Vasai Virar) आयोजित कार्यक्रमामध्ये अंमली पदार्थांचा वापर होण्याची शक्यता असल्याचे संकेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार शुक्रवारी अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक अमर मराठे, पोलीस हवालदार प्रदिप टक्के, महेश पागधरे, सुनिल कुडवे, अजय सपकाळ, सुभाष आव्हाड, अजय यादव या पोलीस पथकाने कारवाईची तयारी केली होती.

यावेळी गस्तीदरम्यान प्रगतीनगरच्या हायटेन्शन रोडवर दोन नायजेरियन तरुण आढळून आले. एकाच्या पाठीवर सॅक बॅग व दुसऱ्याच्या खांदयावर क्रॉसमध्ये लहान सॅक अडकवली होती. त्या दोघांच्या हालचाली संशयास्पद वाटत असल्याने त्याचेकडे कोणतातरी अंमली पदार्थ असल्याची शक्यता निर्माण झाल्याने त्यांना ताब्यात घेतले.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्या दोघांची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे १ करोड १० लाख ८८ हजार रुपये किंमतीचे ५५४.४ ग्रॅम वजनाचे मॅफेड्रॉन व ३६ लाख १२ हजार रुपये किंमतीचे १२०.४ ग्रॅम वजनाचे कोकेन असा एकुण १ करोड ४७ लाख रुपये किंमतीचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. तुळींज पोलीस ठाण्यात आरोपी दिवाईन चुकवूमेका आणि चिकवु फ्रेडिंनंद ओकीतो नवमारी यांच्याविरोधात एनडीपीएस कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंमुळेच गेली 1999मध्ये युतीची सत्ता, देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप

Sushma Andhare : 'लाव रे तो व्हिडिओवर' सुषमा अंधारेंची तिखट प्रतिक्रिया; बाळासाहेबांचं नाव घेत राज ठाकरेंना सुनावलं

Horoscope: 1 वर्षानंतर सूर्य होणार शुक्राच्या राशीत विराजमान, 3 राशींचा होणार फायदा; या 2 राशींचे लोक राहा सावध

PoK तापलं; आंदोलनकर्ते आणि पोलीस कर्मचारी आमनेसामने; एका अधिकाऱ्याचा मृत्यू, १०० जण जखमी

RCB vs DC: बेंगळुरूचा 'चॅम्पियन' गेम; पॉईंट्स टेबलमध्ये घेतली भरारी

SCROLL FOR NEXT