Chembur Crime SAAM TV
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: शाळकरी मुलींचा पाठलाग करत केले अश्लील चाळे, चेंबूरमधील संतापजनक घटना

Chembur Crime: या संतापजनक घटनेप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. नानासाहेब असे या ४५ वर्षीय आरोपीचं नाव आहे.

Chandrakant Jagtap

>> सचिन गाड, साम टीव्ही

A Person Chased Schoolgirls And Molested In Chembur : शाळकरी मुलींचा पाठलाग करून त्यांच्यासमोर अश्लील चाळे केल्याची संतापजनक घटना चेंबूरमध्ये घडली आहे. या संतापजनक घटनेप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. नानासाहेब असे या ४५ वर्षीय आरोपीचं नाव असून चेंबूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.

याविषयी सविस्तर माहिती अशी की, १७ जुलै रोजी तीन मुली शाळेतून घरी परतत असताना आरोपीने चेंबूर नाका येथून त्यांचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. त्याने चेंबूर नाका ते क्रिष्ण लीला हॉटेलपर्यंत त्यांचा पाठलाग केला आणि त्यांच्यासमोर अश्लील चाळे केले. त्याच्या या प्रकारामुळे तिन्ही मुली प्रचंड घाबरल्या होत्या. (Tajya Marathi Batmya)

या मुलींनी कसंबसं घर गाठलं आणि यातल्या एका मुलीने आपल्या पालकांना घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. यानंतर तिच्या पालकांनी इतर मुलींच्या पालकांशी संपर्क केला. यानंतर तिन्ही मुलींच्या पालकांनी चेंबूर पोलीस ठाणे गाठले आणि घडलेला प्रकार सांगून पोलिसांत तक्रार दाखल केली. (Breaking News)

गुरुवारी ही तक्रार दाखल होताच पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम सुरू केली आणि आरोपीला अटक केली. आरोपी नानासाहेब हा सिद्धार्थ कॉलनी येथील रहिवासी असून ते पेशाने चालक आहे. त्याने आणखी काही मुलींसोबत असा प्रकार केला आहे का? याचा तपास चेंबूर पोलीस करत आहेत. या प्रकरणी आरोपी नानासाहेबला भा.दं.वि. ३५४(ड), ५०९ आणि पॉक्सो कायद्याच्या कलम १२ अंतर्गत अटक करण्यात आली आहे. (Latest Political News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला परवानगी, शिवाजी पार्कवर उद्धव यांच्यासह राजही दिसणार?

Breast Cancer : ब्रेस्ट कॅन्सर न होण्यासाठी कोणते पदार्थ टाळावे?

Maharashtra Live News Update : मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री छगन भुजबळ यांचा एकत्र विमानाने प्रवास

Taloda Heavy Rain : मुसळधार पावसामुळे आतोनात नुकसान; मिरचीसाठी अडीच लाख खर्च, उत्पन्न २५ हजाराचे

Pitru Paksha 2025: पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पितृपक्षात करा हे दान

SCROLL FOR NEXT