Dombivali Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Dombivali Crime News: संतापजनक! आई कामानिमित्त बाहेर गेली, नराधमाने भावासमोरच बहिणीला खोलीत खेचलं अन्...

Dombivali Crime News: गेल्या काही दिवसांपासून मुंबईत महिला अत्याचारांच्या घटनेत वाढ झाली आहे. यामध्ये अल्पवयीन मुलीचं प्रमाण सर्वाधिक आहे.

साम टिव्ही ब्युरो

Dombivali Crime News: गेल्या काही दिवसांपासून मुंबईत महिला अत्याचारांच्या घटनेत वाढ झाली आहे. यामध्ये अल्पवयीन मुलीचं प्रमाण सर्वाधिक आहे. एकीकडे पोलिस आरोपींच्या मुसक्या आवळत असताना दुसरीकडे डोंबिवलीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

अवघ्या ६ वर्षीय चिमुकलीसोबत एका २२ वर्षीय अश्लिल कृ्त्य करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी तरुणाला ताब्यात घेतलं आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. (Breaking Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीची आई कामानिमित्त शेजारच्यांकडे गेली होती. तुम्ही पाठीमागून या असं आईने मुलाला आणि मुलीला सांगितले. मग भाऊ आपल्या ६ वर्षीय बहिणीला घेऊन जात असतानाच आरोपीने त्या अल्पवयीन मुलीला हात पकडून घरी आणले.

जेव्हा भाऊ त्याच्या आईजवळ पोहचला तेव्हा चिमुकली कुठे आहे, असं तिने विचारलं. त्यानंतर भावाने ही बाब आईला सांगितली. पीडित मुलीच्या आईने त्वरीत घराकडे धाव घेतली. आरोपी तरुणाच्या घराचा दरवाजा हा बंद असल्याने त्यांनी त्याचा दरवाजा ठोठावला. (Latest Marathi News)

त्यानंतर त्यांच्या मुलीने रडत रडत घराचा दरवाजा उघडला. पीडित मुलीच्या आईने मुलीला घरात नेऊन तिला विश्वासात घेऊन तिच्यासोबत काय झाले का? याची विचारणा केली असता. तिने घडलेला प्रकार सांगितला.

पीडितेच्या कुटुंबीयांनी डोंबिवली रामनगर पोलिस (Police) ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : "काय म्हणताय धाराशिव?" सोशल मीडियाच्या माध्यमातून महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

BMC Election 2026: मुंबईत मनसेला भगदाड, भाजपनंतर शिवसेनेकडून धक्का, शेकडो पदाधिकारी शिंदेसेनेत

Destination Wedding Places : डेस्टिनेशन वेडिंग प्लान करताय? ही आहेत भन्नाट लोकेशन्स

Film Director Death: प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; मनोरंजन विश्वावर शोककळा

Irrfan Khan Birth Anniversary : इरफान खानने वाचवला होता जीव; आज 'तो' आहे IPS ऑफिसर, नेमका किस्सा काय?

SCROLL FOR NEXT