Mumbai Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: मुंबईत चित्रपटाच्या शूटिंगसाठी आलेल्या तरुणीवर बलात्कार; मरीन ड्राईव्ह परिसरातील घटना

Mumbai Crime News: मुंबई हे महिलांसाठी सुरक्षित शहर म्हणवले जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मुंबईतही महिलांवरील अत्याचार वाढत चालले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai Crime News: मुंबई हे महिलांसाठी सुरक्षित शहर म्हणवले जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मुंबईतही महिलांवरील अत्याचार वाढत चालले आहेत. तशा तक्रारी सुद्धा विविध पोलिस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. दरम्यान, मुंबई पोलिस अत्याचार करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळत असताना मरीन ड्राईव्ह परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. (Breaking Marathi News)

चित्रपटाच्या शूटिंगसाठी हरियाणावरून मुंबईत (Mumbai Crime) आलेल्या एका १९ वर्षीय तरुणीवर तिच्या सहकाऱ्यानेच बलात्कार केला आहे. मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तिच्या ३८ वर्षीय मित्राला अटक केली आहे. (Latest Marathi News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता आणि आरोपी एकमेकांना ओळखतात. ते बुधवारी हरियाणातून चित्रपटाच्या शूटिंगसाठी मुंबईत आले होते. रविवारी शूटिंग संपल्यानंतर १९ वर्षीय तरुणी आणि तिचा ३८ वर्षीय सहकारी मरीन ड्राईव्ह परिसरातील एका हॉटेलमध्ये थांबले होते.

पीडितेच्या तक्रारीनुसार, आरोपीने रात्री तिच्या रुमची बेल वाजवली. दार उघडताच त्याने रुममध्ये जबरदस्तीने प्रवेश केला. त्यानंतर आरोपीने पीडितेवर बलात्कार (Crime News) केला. पीडितेने विरोध केला असता, त्याने जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली. रविवारी रात्रभर तो तिच्यावर बलात्कार करत राहिला.

दरम्यान, या घटनेनंतर पीडितेला मोठा धक्का बसला. तिने तातडीने पोलिसांत धाव घेतली. दरम्यान, पीडितेने दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल करत तिच्या ३८ वर्षीय साथीदाराला ताब्यात घेतले. त्याला कोर्टात हजर केले असता, कोर्टाने १२ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Parbhani : आदर्श शेतवाटणी! दोन प्राध्यापक भावांनी शेतकरी भावाला दिला अधिक हिस्सा; मुलांचे शिक्षण व लग्नाचीही घेतली जबाबदारी

Crime News: मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्याने पित्याला अमानुष मारहाण; पाहा, VIDEO

Stress Relief: फक्त ५ मिनिटांत ताण कमी करण्यासाठी प्रभावी मानसिक उपाय

Maharashtra Live News Update: शिवसेना ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांनी मंत्री नितेश राणे यांना डिवचले

BJP National President: भाजपला पहिल्यांदा मिळू शकतात महिला राष्ट्रीय अध्यक्ष, ३ नावं आहेत चर्चेत

SCROLL FOR NEXT