Ajinkya Naik group celebrates victory in MCA elections as Jitendra Awhad takes over as Vice President. saam tv
मुंबई/पुणे

MCA Election: मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणूक; अजिंक्य नाईक गटाला 12 जागा, आशिष शेलारांना धक्का, उपाध्यक्षपदी जितेंद्र आव्हाड

MCA Election Results: मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणुकीत अजिंक्य नाईक यांची अध्यक्ष म्हणून निवड झालीय. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत एकूण 362 जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

Bharat Jadhav

मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक अत्यंत चुरशीने झाली. अजिंक्य नाईक यांची आधीच एमसीएच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर मुंबई क्रिकेट असोसिएशन उपाध्यक्षपदी जितेंद्र आव्हाड यांची निवड करण्यात आली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत एकूण 362 जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

मुंबई क्रिकेट असोसिएशनचा निकाल

उपाध्यक्ष - जितेंद्र आव्हाड 203 विजयी वि. नवीन शेट्टी 155

सचिव - उन्मेष खानविलकर 227 विजयी वि. शाह आलम शेख 129

संयुक्त सचिव - निलेश भोसले 228 विजयी वि. गौरव पय्याडे 128

खजिनदार - अरमान मलिक 237 विजयी वि. सुरेंद्र शेवाळे 119

मुंबई टी20 गव्हर्निंग कौन्सिल मेंबर

भरत किणी 184 विजयी वि. किशोर जैन

अजिंक्य नाईक यांची याआधी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली होती. त्यानंतर इतर कार्यकारिणीसाठी शरद पवार आणि आशिष शेलार यांच्यामध्ये बैठक झाली. यात काही नावे निवडण्यात आली होती. मात्र अजिंक्य नाईक यांनी लावलेल्या होर्डिंगमध्ये आशिष शेलार गटाला अपेक्षित काही नावे नव्हती. त्यामुळे त्यासाठी पुन्हा निवडणूक झाली. निवडून आलेल्या नव्या कारकारिणीमध्ये अजिंक्य नाईक यांच्या नेतृत्वात लढलेले १२ जण निवडून आले. तर आशिष शेलार यांच्याशी संबंधित चार जणांनी विजय मिळवला.

ही आमच्या मैदान क्लब्स, सचिव आणि प्रत्येक महिला व पुरुष क्रिकेटपटूंच्या एकत्रित परिश्रमांची विजयगाथा आहे. हा विजय संपूर्ण मुंबई क्रिकेट परिवाराचा असून आपल्या शहराच्या क्रिकेट परंपरेचा अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी निकालानंतर दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पनवेलजवळ अपघात, रेल्वे ट्रॅकवरून मालगाडी घसरली, VIDEO

Palak Kofta Recipe: घरीच बनवा कुरकुरीत पालक कोफ्ते; चव चाखून विसराल हॉटेलची डिश

Maharashtra Live News Update : अंबादास दानवे यांनी घेतली संजय राऊत यांच्या निवासस्थानी भेट

Putin india tour : पुतिन यांच्या भारत दौऱ्याने काय मिळणार? या क्षेत्रात होणार फायदा, ८ महत्वाचे करार गेमचेंजर ठरणार?

मार्केट होणार जॅम! Maruti Suzuki e-Vitara लॉन्च; ५०० किमीची रेन्ज अन् ५ हायटेक फीचर्स

SCROLL FOR NEXT