Hemant Nagrale Saam Tv
मुंबई/पुणे

Bulli Bai App: गुन्ह्याची व्याप्ती मोठी, 'अशी' करायचे महिलांची बदनामी- Mumbai CP

बुली बाई अॅप प्रकरणात आज मुंबई पोलिसांच्या सायबर पथकाने उत्तराखंड मधून 21 वर्षीय सिव्हिल इंजिनिअरला अटक केली आहे.

सुरज सावंत

सुरज सावंत

मुंबई : बुली बाई अॅप प्रकरणात आज मुंबई पोलिसांच्या सायबर पथकाने उत्तराखंड मधून 21 वर्षीय सिव्हिल इंजिनिअरला अटक केली आहे. आत्तापर्यंत पोलिसांकडून यामध्ये एकूण 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. याबद्दल मुंबईचे (Mumbai) पोलिस आयुक्त हेमंत नगराळे (Hemant Nagrale) यांनी पत्रकार परिषद घेत अधिक माहिती दिली आहे. (Mumbai cp Hemant Nagrale has given information on Bulli Bai App)

त्यांनी यावेळी सांगितलं की, 'अत्यंत संवेदनशील हा गुन्हा आहे. या गुन्ह्यातून अनेक चुकीच्या अफवा ही पसरवल्या जात असल्याने आणि आत्तापर्यंत काय कारवाई झालेली आहे याची खात्रीशीर माहिती देण्यासाठीच पत्रकार परिषद घेण्यात आली आहे.'

हेमंत नगराळे यांनी माहिती देत सांगितलं की, या गुन्ह्यांची व्याप्ती मोठी आहे. अनेक माहीती ही सांगता येणार नाही कारण गुन्हा संवेदनशील आहे. हा संपूर्ण गुन्हा ऑनलाईन घडवण्यात आला असल्याने इतर सह आरोपींना त्याचा फायदा होऊ नये.

या सर्व प्रकारची पार्श्वभूमी सांगताना हेमंत नागराळे यांनी सांगितलं की, इंटरनेट बुली बाई हे अॅप बनवण्यात आलं होतं. त्या पेजवर क्लिक केल्यानंतर त्या साईडवर नेलं जात होतं. सोशल मीडिया वरील विशिष्ठ महिलांचे फोटो अपलोडकरून त्यांच्या भावना दुखावतील असे मेसेज अपलोड केले गेले होते.

३१ डिसेंबरला हा अॅप डेव्हलप झाला त्यानंतर २ जानेवारी रोजी आम्ही गुन्हा दाखल केला. बुल्ली बाई नावान ट्विटर हँडल (Twitter Handle) देखील बनवण्यात आलं होतं. ज्यानेकरून हा अॅप सर्वत्र प्रसिद्ध व्हावा हा हेतू होता. गुन्हा दाखल झाल्यावर फॉलोअर्स ची माहिती काढली. आरोपींचा शोध घेत असताना बेंगलोरहून कुमार विशाल सेंकड इअर इंजिनिअरिंगचा मुलगा आणि इतर चार जणांचा सहभाग होता. विशाल हा देखील फॉलोअर होता. या वेबसाईटचे 5 फॉलोअर्स आहेत. तपासात प्रत्येक आरोपींचा सहभाग निश्चित झाला आहे. त्यानंतर एक एक आरोपींना ताब्यात घेणं सुरु झालं.

हे देखील पहा-

त्यानुसार आत्तापर्यंत तीन आरोपींना अटक केली यातील विशाल झा, श्वेता सिंह आणि तिसरा आरोपी याला ही ट्रान्जिस्ट रिमांडवर मुंबईत आणलं जाणार आहे. तपास अजून सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या पाळामुळं खोदून काढणयाचं काम मुंबई पोलिस करतील अशा प्रकारच्या घटना पुढे होऊ नये याकरता नागरिकांना विशेषता महिला व मुलींना सुचित करण्यात येईल.

जे ट्विटर हँडल या गुन्ह्यात वापरले गेले काही ईमेलही आहेत. ज्यांना या घटनेबाबत माहिती द्यायची आहे त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT