Bulli Bai Case: 21 वर्षीय सिव्हील इंजिनिअरला उत्तराखंडमधून अटक; मुंबई पोलिसांच्या सायबर सेलची कारवाई

मुंबई पोलिसांच्या सायबर सेलची कारवाई
Mumbai : 21 कोटींच्या अंमली पदार्थसह महिला तस्करला अटक (पहा Video)
Mumbai : 21 कोटींच्या अंमली पदार्थसह महिला तस्करला अटक (पहा Video)Saam Tv
Published On

रश्मी पुराणिक (मुंबई)

सायबर पोलिसांनी उत्तराखंडमधील एका 21 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. उत्तराखंडमधील ही दुसरी अटक असे, तर ‘बुली बाई’ अ‍ॅपवर सुरू असलेल्या तपासासंदर्भात तिसरी अटक आहे. मयांक रावल असे अटक करण्यात आलेल्या तिसऱ्या आरोपीचे नाव आहे. त्याला मुंबई सायबर पोलिसांच्या (Mumbai Cyber Police) तीन सदस्यीय पथकाने ही अटकेची कारवाई केली आहे. याप्रकरणी 18 वर्षीय श्वेता सिंग या तरुणीला पोलिसांनी मंगळवारी अटक केली होती. (Bulli bai case news in marathi today)

श्वेताप्रमाणेच, मयांक याचाही काही ट्विटर हँडल वापरून ट्विटरवर बुली बाई अ‍ॅपच्या प्रचार करण्यात सहभाग असल्याचा संशय पोलिसांना होता. इंटरनेटवर (Internet) वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रसिद्ध मुस्लीम महिलांचे छायाचित्रे वापरणे आणि आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्याप्रकरणी बुली बाई अ‍ॅप्लिकेशन निर्माता व ट्विटर हॅण्डल चालवणाऱ्या विरोधात पश्चिम प्रादेशिक सायबर पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केला होता.

Mumbai : 21 कोटींच्या अंमली पदार्थसह महिला तस्करला अटक (पहा Video)
Bulli Bai App Case: 'आयटी हब बनतोय, धमक्यांचा हब'

मयांक रावलला स्थानिक न्यायालयात ट्रान्झिट रिमांडसाठी हजर केले जाणार आहे. तसेच अटक केलेल्या दोन आरोपींना आज रात्री मुंबईत एकत्र आणले जाईल, असे पोलिसांच्या सुत्रांनी माहिती दिली आहे.

रावल आणि श्वेता या दोघांच्या आधी मुंबई पोलीस उपायुक्त (सायबर) डॉ. रश्मी करंदीकर यांच्या टीमने बेंगळुरूचा रहिवासी असणाऱ्या 21 वर्षीय विशाल कुमारला अटक करण्यात आली होती. विशाल कुमार हा सिव्हिल इंजिनिअरिंगच्या (Civil Engineering) द्वितीय वर्षाचा विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे.

हे देखील पहा-

समाजमाध्यमंवरील महिलांची बदनामी करणाऱ्या बुली-बाई अॅप प्रकरणात दिल्ली आणि मुंबईतील पोलिसांनी आतापर्यंत गुन्हा दाखल केला आहे. बुली-बाई अॅपवर समाजमाध्यमांवर असलेल्या मुस्लिम महिलांची छायाचित्रे 'बुली-बाई आॅफ द डे' म्हणून प्रसारित केली जात होती. मुस्लिम महिलांची छायाचित्र प्रसारित झाल्यानंतर दिवसभर आक्षेपार्ह टिका टिप्पणी त्यावर केली जात होती. आतापर्यंत 100 मुस्लिम महिलांना लक्ष करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com