Bulli Bai App Case: 'आयटी हब बनतोय, धमक्यांचा हब'

उदाहरणं द्यायची झाली तर काही दिवसांपूर्वी पर्यावरण मंत्री आदीत्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.
Bulli Bai App Case: 'आयटी हब बनतोय, धमक्यांचा हब'
Bulli Bai App Case: 'आयटी हब बनतोय, धमक्यांचा हब'Saam TV

मुंबई : देशाचे 'आयटी हब' म्हणून ओळखले जाणारे बेंगलोर हे सध्या सायबर गुन्ह्यांमुळे पून्हा चर्चेत आलं आहे. एका मागून एक अनेक महत्वाच्या गुन्ह्यातील आरोपी हे बेंगलोरमधून अटक होत असल्याने सध्या देशाचे आयटी हब (Bangalore IT Hub) म्हणून ओळखले जाणारे हे शहर धमकयाचा हब झालं आहे का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

उदाहरणं द्यायची झाली तर काही दिवसांपूर्वी पर्यावरण मंत्री आदीत्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या घटनेची गंभीर दखल घेत सायबर पोलिसांनी तपासाला सुरूवात केली अखेर बेंगलोर मधूनच सायबर पोलिसांनी (Police) ३४ वर्षीय जयसिंग राजपूत याला अटक केली. चौकशीत तो सुशांत सिंहचा (Sushant Singh Rajput) फॅन होता. सुशांत सिंहच्या आत्महत्येला त्याने आदीत्य ठाकरे यांना जबाबदार धरत,आदीत्य ठाकरे यांना व्हाँट्स अँपवर मेसेज केले, उत्तर न मिळाल्याने थेट फोन ही केला. त्यानंतर राजपूतने आदीत्य ठाकरेंना जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे तपासात समोर आले होते. सध्या बुली-बाई (Bulli Bai) प्रकरण खूप गाजत आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांनीही गुन्हा नोंदवला आहे.

Bulli Bai App Case: 'आयटी हब बनतोय, धमक्यांचा हब'
Bharati Pawar: आताच काळजी घ्या; केंद्र सरकार सर्व मदत करायला तयार

आणखी प्रकरणं

- समाजमाध्यमंवरील महिलांची बदनामी करणाऱ्या बुली-बाई अॅप प्रकरणात दिल्ली आणि मुंबईतील पोलिसांनी आतापर्यंत गुन्हा दाखल केला आहे.

- बुली-बाई अॅपवर समाजमाध्यमांवर असलेल्या मुस्लिम महिलांची छायाचित्रे 'बुली-बाई आॅफ द डे' म्हणून प्रसारित केली जात होती.

- मुस्लिम महिलांची छायाचित्र प्रसारित झाल्यानंतर दिवसभर आक्षेपार्ह टिका टिप्पणी त्यावर केली जात होती.

- आतापर्यंत १०० मुस्लिम महिलांना लक्ष करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.

बुली-बाई अॅप प्रकरणातही मुंबई पोलिसांच्या सायबर पोलिसांनी सोमवारी बेंगलोरहून २१ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले आहे. तपासात बुली-बाई अॅप संदर्भात सायबर पोलिसांनी तीन ट्विटर हँडल मिळाले होते. याच अकाऊंटची माहिती पोलिसांनी ट्विटरकडे मागितली होती. तसेच पोलिसांनी गुगलशी संपर्क साधून बुली-बाई अॅप हे गिटहब या डोमेनवरून ब्लाॅक करण्यात आले आहे.

सायबर पोलिसांनी आतापर्यंत दोन महत्वाच्या गुन्ह्यातील आरोपींना बेंगलोरहून अटक केली आहे. इतर अनेक सायबर संदर्भातील गुन्ह्याचे धागेदोरे हे बेंगलोरशी जोडले गेले असल्याचे अनेकदा तपासातून समोर आले असल्याने देशाचे आयटी हब म्हणून ओळखले जाणारे हे शहर धमकयाचा हब झालं आहे का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com