sanjay raut, sujit patkar saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Covid Scam: संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांना मुंबई पोलिसांनी केली अटक

Mumbai News: संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांना मुंबई पोलिसांनी केली अटक

साम टिव्ही ब्युरो

Mumbai Covid scam: ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय उद्योजक सुजित पाटकर यांना मुंबई पोलिसांनी अटक केली. पाटकर यांना मुंबईचे कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी 36 कोटींचा कोविड सेंटर घोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मुंबईच्या आझाद मैदान पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ईडीने यापूर्वी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात पाटकर यांना अटक केली होती.

ईडीच्या चौकशीत सुजीत पाटकरांच्या घराचीही झडती घेण्यात आली होती. यावेळी अलिबागच्या जमिनीच्या व्यवहाराचे पेपर मिळाले होते. आणि त्या व्यवहारात पाटकरांची पत्नी आणि वर्षा राऊत ज्या संजय राऊतांच्या पत्नी आहेत त्यांची नावं होती. (Latest Marathi News)

काय आहे प्रकरण?

याप्रकरणी दाखल झालेल्या एफआयआर नुसार, कोविड काळात वरळी, मूलूंड, दहिसर आणि पुण्यातील जबो कोविड केंद्रांचे कंत्राट मिळवण्यासाठी सुजित पाटकर यांच्या लाईफलाईन हॉस्पीटल मॅनेजमेंट सर्विसने पालिकेला खोटा भागीदारी करार दाखवला. रातोरात या कंपन्या उभ्या केल्या.

वैद्यकीय क्षेत्रात कुठलाही पुर्वअनूभव नसताना सुजित पाटकर यांच्या कंपनीने कोविड केंद्र चालवण्याचे कंत्राट घेतले. १३ वेळा कंपनीला कॉन्ट्रक्ट दिलं होतं. पण ती कंपनी रजिस्टर नव्हती.

कोविड केंद्रात काम करत असलेले कर्मचारी, डॉक्टर यांच्याकडे कुठलेही अधिकृत वैद्यकीय प्रमाणपत्र नव्हते. रुग्णांवर इलाज करण्यास ते अपयशी ठरले. त्यामुळे अनेक रुग्णांना त्रास झाला असल्याचे या एफआयआरमध्ये सांगण्यात आले. त्यानंतर पुणे महानगरपालिकेने ब्लॅक लिस्ट केले. पण मुंबईमध्ये पाटकरांची कंपना कॉन्ट्रक्ट घेत होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Death: पोलीस दलात आत्महत्येचं सत्र काही थांबेना! ४ दिवसात ३ आत्महत्या, काय आहे कारण?

Mahalaxmi Vrat 2025 : महालक्ष्मी व्रताची तारीख, पूजा विधी, महत्व घ्या जाणून

Maharashtra Live News Update: ते वक्तव्य करून अजित पवारांकडून मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न; राम शिंदेंचा आरोप

Gunfire Shooting : क्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार! तिघांचा जागीच मृत्यू, आठजण जखमी

Astro Tips: सकाळी उठल्यावर आरशात पाहणे शुभ असते की अशुभ?

SCROLL FOR NEXT