Sanjay Raut saam tv
मुंबई/पुणे

शंभर कोटींच्या मानहानी दाव्याप्रकरणी संजय राऊतांना न्यायालयाचे समन्स; 'या' तारखेस हजर रहा!

काही दिवसांपुर्वी साेमय्यांच्या पत्नीने राऊत यांच्याबाबत तक्रार केली हाेती.

Siddharth Latkar

मुंबई (sanjay raut latest marathi news) : भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांच्या पत्नीने दाखल केलेल्या शंभर काेटींच्या अब्रुनुकसानीची तक्रारी प्रकरणी मुंबई न्यायालयाने (Mumbai Court) शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (sanjay raut) यांना समन्स बजावले आहे. येत्या ४ जुलैस राऊत यांनी न्यायालयात हजर राहवे अशी सूचना न्यायालयाने केली आहे. (Mumbai Court issues summons to Shiv Sena leader Sanjay Raut in the defamation complaint filed by the wife of BJP leader Kirit Somaiya)

भाजपा नेते किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी नऊ मे राेजी नवघर पोलीस ठाण्यात जाऊन शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या विरोधात तक्रार दाखल केली हाेती. त्यावेळी साेमय्या यांनी आठ दिवसात पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही तर याविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी सांगितले हाेते.

असे आहे प्रकरण

संजय राऊतांनी किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले होते. विक्रांत घोटाळा असेल किंवा टॉयलेट घोटाळा असेल यात सोमय्यांनी घोटाळा केला आहे असे संजय राऊत म्हणाले आहेत. आगामी काळातही अनेक घोटाळे बाहेर येतील असे राऊत यांनी म्हटले हाेते.

राऊतांना न्यायालयाचे समन्स

किरीट सोमय्या, त्यांचे पुत्र नील सोमय्या आणि पत्नी मेधा सोमय्या यांनी राऊत यांच्यावर अब्रुनुकसानीची तक्रार दाखल केल्यानंतर न्यायालयात देखील धाव घेतली हाेती. आज मुंबई न्यायालयाने राऊत यांनी या प्रकरणी चार जूलैस न्यायालयात उपस्थित राहसमन्स बजावले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

PM Modi: बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात दिला रिमोट कंट्रोल; उद्धव ठाकरेंवर पीएम मोदींचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT