Navneet Rana Ravi Rana  SAAM TV
मुंबई/पुणे

Navneet Rana : नवनीत राणांना अटक होणार? कोर्टाने काढलं अजामीनपात्र अटक वॉरंट

गेल्या महिनाभरात नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आल्याची ही दुसरी वेळ आहे.

साम टिव्ही ब्युरो

Amravati MP Navneet Rana News : अमरावतीच्या (Amravati) अपक्ष खासदार नवनीत राणा पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. कारण, मुंबईतील कोर्टाने नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांच्या वडिलांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट काढलं आहे. जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून कोर्टाने हे वॉरंट काढले असून शाळा सोडल्याच्या खोट्या दाखल्यावरून जातीचा दाखला मिळवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. (Navneet Rana News Today)

गेल्या महिनाभरात नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आल्याची ही दुसरी वेळ आहे. राणा ज्या जागेवरून खासदार म्हणून निवडून आल्या ती जागा अनुसूचित जातीसाठी आरक्षित होती. परंतू राणा यांनी त्या अनुसूचित जातीतील असल्याचा दावा केला होता आणि निवडणूक लढवली होती. (Navneet Rana Latest News)

शाळा सोडल्याच्या खोट्या दाखल्याच्या आधारे त्यांनी जात प्रमाणपत्र मिळवून फसवणूक केल्याप्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार, नवनीत राणा यांच्याविरोधात कोर्टाने अटक वॉरंट बजावले आहे. दरम्यान, अटक वॉरंट निघताच नवनीत राणा यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nisha Parulekar: अभिनय क्षेत्रातून थेट राजकारणात उडी; मुंबईच्या नगरसेविका निशा परुळेकर कोण आहेत?

Chanakya Niti: श्रीमंत होण्याआधी माणसाच्या विचारांमध्ये कोणते बदल केले पाहिजेत?

Satara Tourism : साताऱ्यातील 'हे' तलाव जणू मिनी काश्मीर, हिवाळ्यात बहरतो निसर्ग

Pune Municipal Corporation Results: पुणे महापालिकेत भाजच बनला 'बाजीराव'; वाचा विजयी उमेदवारांची यादी

Sanjay Raut on BMC Election: भाजप ५१, ठाकरे ४९, अजून ६०-७५ जागांचा निकाल बाकी, ठाकरेंना अजूनही विश्वास

SCROLL FOR NEXT