Yavatmal : पेट्रोल-डिझेलला बाय-बाय! यवतमाळच्या तरुणाने बनवली स्वयंचलित ‘हायड्रोजन कार’

हायट्रोजन गॅसवर चालणाऱ्या या कारमधून केवळ १५० रुपयांत २५० किलोमीटरचा प्रवास करता येणार आहे.
Yavatmal Student Made By Hydrogen Car
Yavatmal Student Made By Hydrogen CarSaam TV

संजय राठोड, साम टिव्ही

यवतमाळ : यवतमाळ (Yavatmal) जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणुन ओळखला जातो. याच जिल्ह्यातील एका शेतकरी पुत्राने भन्नाट कल्पनेतून स्वयंचलित ‘सोनिक कार’ बनवली आहे. हायड्रोजन गॅसवर चालणाऱ्या या कारमधून (Car) केवळ १५० रुपयांत २५० किलोमीटरचा प्रवास करता येणार आहे. सेल्फ ड्रायव्हिंगसाठी संगणकही तयार केले आहे. (Yavatmal Student Made By Hydrogen Car)

Yavatmal Student Made By Hydrogen Car
Petrol Diesel: कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण; पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?

हर्षल नक्षणे असं या तरुणाचं नाव असून तो यवतमाळमधील वणी येथील रहिवाशी आहे. हर्षलने एम टेक पर्यंत शिक्षण घेतले आहे. सध्याच्या काळात वाहन वापरणाऱ्यांची संख्या वाढली असून, दररोज हजारो वाहने रस्त्यावरून धावत आहे. तसेच पेट्रोल व डिजेलचे दर १२० रुपयांवर पोहचले आहे. यावर उपाय म्हणून हर्षलने आपला मित्र कुणाल आसुटकरच्या मदतीने अफलातून अशी प्रदुषण मुक्त स्वयंचित ‘सोनिक कार’ तयार केली आहे.

हायड्रोजनवरील कार बनवण्याचे हर्षलचे स्वप्न होते. त्यासाठी त्याने एका नावाने कंपनी देखील रजिस्टर केली आणि मित्राच्या मदतीने कार बनविण्याचे काम सुरू केला. काही दिवसापूर्वीच ही कार तयार झाली आहे. हायट्रोजन गॅसवर चालविणारी ही कार आहे. सेल्फ ड्रायव्हींगसाठी संगणक तयार केले आहे . (Yavatmal News Today)

हर्षलने बनवलेली ही कार एक लिटर हायट्रोजनमध्ये २५० किमी धावणार आहे. कारसाठी लागणारे पार्ट अहमदाबाद येथून खरेदी करण्यात आले. प्रायोगिक तत्वावर ही कार तयार कली असून, त्यासाठी तब्बल २५ लाख रुपये खर्च आला आहे. १०० कार तयार झाल्यानंतर ही कार विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com