Corona In Mumbai Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Corona Update: मुंबईत टेन्शन वाढले; अवघ्या २४ तासांत पालटले चित्र

मुंबई शहरात करोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली आहे. त्यामुळं चिंतेत भर पडली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: देशाची आर्थिक राजधानी मुंबईत (Mumbai) कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मंगळवारी कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ नोंदवली गेली. अवघ्या २४ तासांत कोरोना रुग्णांच्या संख्येत ६० टक्क्यांची वाढ झाली आहे. मंगळवारी मुंबईत कोरोनाचे ८५ रुग्ण आढळले. यापूर्वी १७ मार्च रोजी ७३ रुग्ण आढळले होते. दरम्यान, दिलासा देणारी बाब म्हणजे मंगळवारी आढळलेल्या ८५ नवीन कोरोना रुग्णांमध्ये कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळून आलेली नाहीत. तसेच कोणत्याही रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आले नाही.

मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे मुंबई महापालिका सतर्क झाली आहे. या परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत, असं महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. पुढील दोन-तीन दिवस अशाच प्रकारे रुग्णसंख्या वाढली तर, आम्हाला धोरणांमध्ये बदल करावा लागेल, असे संकेत अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहेत. रुग्णसंख्या वाढली तर, चाचण्या वाढवण्यात येतील. आंतरराष्ट्रीय विमानतळावर चाचण्यांबाबतचा निर्णय केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लागू करण्यात येईल, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबईतील नागरिकांना मास्क घालण्याच्या सूचना वेळोवेळी दिल्या जात आहेत. मात्र, मास्क अनिवार्य करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही, असं अधिकाऱ्यानं स्पष्ट केलं आहे. रुग्णसंख्या आणि परिस्थिती बघूनच याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असंही सांगण्यात आलं. दरम्यान, कोरोनाची तिसरी लाट आटोक्यात आल्यानंतरही मुंबई महापालिकेने चाचण्या बंद केलेल्या नाहीत. २६६ केंद्रांवर अजूनही चाचण्या केल्या जात आहेत. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, मुंबईत दररोज सरासरी १० हजार नागरिकांच्या कोरोना चाचण्या केल्या जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dabeli Bhaji Recipe : दाबेलीसाठी परफेक्ट भाजी कशी बनवाल? वाचा सीक्रेट रेसिपी

Maharashtra Live News Update: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्या: सदाभाऊ खोत यांची मागणी

Shubman Gill: शुभमन गिलने इतिहास रचला, विराट कोहली आणि सर डॉन ब्रॅडमॅनचा रेकॉर्ड मोडला

Shocking : लव्ह मॅरेजनंतर ४ महिन्यांनी जवानाच्या पत्नीने आयुष्य संपवलं; इन्स्टाग्रामवर पोस्ट केला शेवटचा व्हिडिओ

Shocking : भांडणानंतर रागाच्या भरात बायको घर सोडून गेली, नंतर नवऱ्यानं आई आणि मुलांसह जे केलं ते पाहून सारेच हादरले

SCROLL FOR NEXT