Corona in Delhi: दिल्लीत पुन्हा निर्बंध?; मास्क न लावल्यास दंड भरावा लागणार

दिल्लीत कोरोनानं पुन्हा डोके वर काढले असून, खबरदारी म्हणून काही निर्बंध पुन्हा लागू होण्याची शक्यता आहे.
Omicron Varient Special Report | ओमायक्रोनसाठी आता वापरावा लागणार डबल मास्क ?; | Double Mask
Omicron Varient Special Report | ओमायक्रोनसाठी आता वापरावा लागणार डबल मास्क ?; | Double MaskSaam Tv
Published On

नवी दिल्ली: देशात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव पुन्हा वाढल्याचं चित्र आहे. कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता असून, केंद्र सरकारने तातडीने पावले उचलली आहेत. महाराष्ट्र, दिल्लीसह पाच राज्यांना पंचसूत्रीचे पालन करण्याच्या सूचना दिल्या असतानाच, दिल्लीत पुन्हा निर्बंध लागू करण्याचा विचार सुरू केला आहे. दिल्लीत पुन्हा मास्कसक्ती केली जाणार आहे, असे कळते. मास्क न घातल्यास ५०० रुपये दंड भरावा लागू शकतो. सूत्रांच्या माहितीनुसार, दिल्लीच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची कोविड १९ संदर्भात बैठक सुरू आहे. या बैठकीत कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी ठोस पावले उचलली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Omicron Varient Special Report | ओमायक्रोनसाठी आता वापरावा लागणार डबल मास्क ?; | Double Mask
जहांगीरपुरी परिसरात मोठा फौजफाटा तैनात; आरोपींच्या अवैध मालमत्तांवर चालणार 'बुलडोजर'

दिल्लीत कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्यामुळं लवकरच निर्बंध लागू केले जाण्याची शक्यता आहे. शाळांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे दिल्ली सरकार लवकरच मोठा निर्णय घेऊ शकतं. मास्कसक्ती होण्याची शक्यता असून, मास्क न घातल्यास दंड आणि शाळांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध होऊ शकतात. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता दिल्लीच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत यासंदर्भात मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे. याच महिन्याच्या सुरुवातीलाच मास्कसक्तीचा निर्णय मागे घेतला होता. मात्र, आता पुन्हा कोरोना विषाणूने डोके वर काढसले आहे. त्यामुळे हा निर्णय पुन्हा लागू होऊ शकतो.

शाळा पुन्हा होणार बंद?

कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन दिल्ली सरकारनं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. कोविड १९ चा प्रादूर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्यास सांगितले आहे. काही खासगी शाळांनी विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी वर्गाला मास्क घालणे अनिवार्य केले आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने पालकही चिंतेत आहेत. कोरोनाग्रस्त मुले बरेच दिवस घरी राहू शकतात. त्यामुळे त्यांच्यासाठी ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय शाळांनी द्यायला हवा, अशी काही पालकांची मागणी आहे. दरम्यान, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत याबाबत काहीतरी निर्णय होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com