Jumbo covid centers closed soon in Mumbai
Jumbo covid centers closed soon in Mumbai Saam Tv
मुंबई/पुणे

Covid Center : कोरोना रुग्णांची संख्या घटली; मुंबई महापालिकेने घेतला मोठा निर्णय

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या घटल्याने महापालिकेने जम्बो कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये ‘कोविड’ बाधित रुग्णांसह लक्षणे असणाऱ्या रुग्णांच्या संख्येमध्ये लक्षणीय घट झाली आहे. तसेच रुग्णालयांमध्ये कोविड रुग्ण भरती होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. ही बाब लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने ‘कोविड जम्बो केअर सेंटर’ टप्पेनिहाय बंद करण्याचे निश्चित केले. असं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे. (Mumbai Corona News)

महापालिकेने काय म्हटलं?

‘कोविड’ साथरोगाच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ‘कोविड’ बाधित रुग्णांवर प्रभावी उपचार करता यावेत, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने विविध ८ ठिकाणी ‘कोविड जम्बो केंद्रे’ कार्यरत होती. या ८ ‘जम्बो कोविड सेंटर’मध्ये १२ हजार ३७५ रुग्‍णशय्या व ९०७ अतिदक्षता रुग्‍णशय्या होत्या.या उपचार केंद्रांच्या माध्यमातून लाखो रुग्णांवर प्रभावी उपचार करण्यात आले. यामुळे अनेक रुग्णांचे जीव वाचविणे शक्य झाले. असं महापालिकेने म्हटलं आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात नागरिकांचे प्रभावीपणे लसीकरण करण्यात आले. परिणामी, गेल्या काही महिन्यांमध्ये ‘कोविड’ बाधित रुग्णांसह लक्षणे असणा-या रुग्णांच्या संख्येमध्ये लक्षणीय घट झाली आहे. तसेच रुग्णालयांमध्ये कोविड रुग्ण भरती होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. ही बाब लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने ‘कोविड जम्बो केअर सेंटर’ टप्पेनिहाय बंद करण्याचे निश्चित केले. असेही महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

‘कोविड जम्बो केअर सेंटर’ टप्पेनिहाय बंद करणार

पहिल्या टप्प्यात ३ ‘कोविड जम्बो केअर सेंटर’ बंद केली. तर आता दुस-या टप्प्यात आणखी ५ केंद्रे बंद करण्याचे ठरविण्यात आले आहे. तथापि, ‘कोविड’ बाधा झाल्यास संबंधित रुग्णांना वेळच्यावेळी योग्य उपचार मिळावेत, या हेतूने सेव्हन हिल्स रुग्णालयासह बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये ‘कोविड’ उपचार सुविधा कार्यरत असणार आहे, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांनी दिली आहे.

ही कोविड सेंटर बंद होणार

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले की, ‘कोविड’ बाधित रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे पहिल्या टप्प्यात दहिसर, नेस्को – गोरेगांव आणि कांजूरमार्ग येथील ‘जम्बो कोविड केअर सेंटर’ यापूर्वीच बंद करण्यात आली आहेत. तर आता दुस-या टप्प्यात वांद्रे - कुर्ला संकुल, रिचर्डसन्स ऍण्ड क्रुडास भायखळा, रिचर्डसन्स ऍण्ड क्रुडास मुलुंड, एन. एस. सी. आय. वरळी आणि मालाड येथील ‘जम्बो कोविड केअर केंद्रे’ बंद करण्याचे ठरविण्यात आले आहे.

दरम्यान कोविड सेंटर बंद होत असली तरी, या ठिकाणी कार्यरत असणारी लसीकरण केंद्रे सुरु राहणार आहेत. ज्यामुळे, लसीकरणाबाबत नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही. असं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे. ‘कोविड’ बाधित रुग्णांची संख्या घटल्यामुळे ८ ‘जम्बो कोविड केअर केंद्रे’ बंद करण्यात येत आहेत. तथापि, नव्याने आढळून येणा-या ‘कोविड’ बाधित रुग्णांना योग्य उपचार मिळावेत, या उद्देशाने सेव्हन हिल्स रुग्णालयासह महानगरपालिकेची ४ प्रमुख रुग्णालये, १६ उपनगरीय रुग्णालये आणि कस्तुरबा रुग्णालय या ठिकाणी कोविड बाधित रुग्णांवर योग्य ते औषधोपचार करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

या व्यतिरिक्त शासनाच्या अखत्यारितील रुग्णालये, खासगी रुग्णालये या ठिकाणी देखील उपचार सुविधा उपलब्ध आहे. यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सदर तिनही प्रकारच्या रुग्णालयांमध्ये एकूण ११ हजार १६५ रुग्णशय्यांची उपलब्धता असून आवश्यकतेनुसार ही संख्या वाढविता येऊ शकेल. तसेच सोमय्या जम्बो सेंटर, शीव (सायन) येथे एक जम्बो कोविड केंद्र सुसज्ज ठेवण्यात आले आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Copper Ring: तांब्याची अंगठी धारण का करावी ? त्यांचे फायदे कोण कोणते ?

Today's Marathi News Live: शरद पवारांचा विश्वासू शिलेदार आज भाजपमध्ये प्रवेश करणार?

Shruti And Santanu Break Up : ४ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर श्रुती हासन आणि शांतनू हजारिकाचा ब्रेकअप?, एकमेकांना इन्स्टाग्रामवर केलं अनफॉलो

Chilled Water: फ्रीजशिवाय थंड पाणी कसं प्यायचं?

Narendra Modi Sabha: भाजपकडून प्रचारसभांचा धडाका, PM मोदी दिवसभरात घेणार ४ सभा, कार्यकर्त्यांकडून जोरदार तयारी

SCROLL FOR NEXT