Unknown person threatened to kill CM Yogi Adityanath  Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai News : मुख्यमंत्रीपद सोडा नाहीतर बाबा सिद्दीकींसारखे मारु, मुंबई पोलिसांना आला धमकीचा मेसेज

Mumbai cops get threat for Yogi Adityanath: बाबा सिद्दीकी यांच्यासारखे योगी आदित्यनाथ यांना मारु, असा धमकीचा मेसेज मुंबई पोलिसांना मिळाला.

Namdeo Kumbhar

Yogi Adityanath News : मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला अज्ञात क्रमांकावरुन मेसेज आला. योगी आदित्यनाथ यांनी दहा दिवसात राजीनामा दिला नाही, तर बाबा सिद्दीकी यांच्यासारखे मारु, असा उल्लेख मेसेजमध्ये करण्यात आलाय. महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुका सुरु आहेत. प्रचारासाठी योगी आदित्यनाथ देखील येण्याची शक्यता आहे, त्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. पोलिसांनी मेसेज गांभिर्याने घेतला असून चौकशी करण्यात येत आहे. (Unknown person threatened to kill CM Yogi Adityanath)

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला अज्ञात क्रमांकावरुन शनिवारी धमकीचा मेसेज आला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मारण्याची धमकी देण्यात आली. दहा दिवसांत राजीनामा दिला नाही, तर बाबा सिद्दीकी यांच्यासारखे गोळ्या झाडून मारु, असे मेसेजमध्ये म्हटले. धमकीचा मेसेज मिळाल्यानंतर पोलीस सतर्क झाले आहेत. मुंबई पोलिसांचे एक पथक या मेसेजचा तपास सुरु केलाय. मुंबई पोलिसांकडून धमकीचा मेसेज पाठवणाऱ्यांचा शोध घेतला जाणार आहे. दुसरीकडे, मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमकडून उत्तर प्रदेश पोलिसांनाही या मेसेजची माहिती देण्यात आली आहे.

बाबा सिद्दीकी यांना गोळ्या झाडून संपवले -

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची दसऱ्याला गोळ्या झाडून हत्या केली होती. सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली होती. सलमान खान आणि दाऊद इब्राहिम यांच्यासोबत संबंध असणाऱ्या प्रत्येकाची अशीच अवस्था केली जाईल, अशी धमकी लॉरेन्स बिश्नोई गँगने दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Veg Biryani Recipe : स्ट्रीट स्टाइल चटपटीत व्हेज बिर्याणी, एकदा खाल तर खातच रहाल

Accident : ऐन सणासुदीत ८ जणांचा अपघाती मृत्यू, पिकअप 100 फुटावरून कोसळला; चांदसैली अपघाताचा ग्राउंड रिपोर्ट समोर

Bihar Elections: एनडीएला मोठा धक्का; निवडणूक न लढताच गमावली एक जागा ? काय कारण, पराभूत उमेदवार कोण?

Isha Malviya: शेकी गर्ल ईशा मालवीयाचा नवा एथनिक लूक पाहिलात का?

Ind vs Aus : भारत-ऑस्ट्रेलिया वनडे सामना होणार रद्द? पर्थच्या हवामानाच्या अंदाजानं पहिल्या मॅचवर संकट

SCROLL FOR NEXT