Controversy Over Prabodhankar Thackerays Book Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai: प्रबोधनकार ठाकरेंच्या पुस्तकावरून वाद, कर्मचाऱ्याच्या अंगावर पुस्तक फेकलं, मनसे आक्रमक; पाहा VIDEO

Controversy Over Prabodhankar Thackerays Book: कस्तुरबा रुग्णालयामध्ये प्रबोधनकार ठाकरे यांचे पुस्तक वाटण्यावरून वाद निर्माण झाला. ज्या कर्मचाऱ्याने हे पुस्तक वाटले त्याला जाब विचारण्यात आला आणि त्याच्या अंगावर पुस्तक फेकून मारण्यात आले.

Priya More

Summary -

  • कस्तुरबा रुग्णालयात प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुस्तकावरून वाद निर्माण झाला.

  • महिला कर्मचाऱ्यांनी पुस्तक वाटणाऱ्या अधिकाऱ्याच्या अंगावर पुस्तक फेकले.

  • राजेंद्र कदम यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून अदखलपात्र गुन्हा नोंदवला गेला.

  • मनसे नेते संदीप देशपांडे यांनी या घटनेचा निषेध केला आणि प्रबोधनकारांचा अपमान असल्याचे सांगितले.

निवृत्ती सोहळ्यानिमित्त प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेले 'देव आणि देवळांचा धर्म' हे पुस्तक कस्तुरबा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना वाटल्याने वाद निर्माण झाला आहे. महिला कर्मचाऱ्यांनी पुस्तक वाटणाऱ्या कक्ष अधिकाऱ्यांनी माफी मागूनही त्यांच्या अंगावर पुस्तक फेकून त्याचा व्हिडीओ तयार करण्यात आला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी आग्रीपाडा पोलिस ठाण्यात महिला कर्मचाऱ्यांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजेंद्र कदम (५८ वर्षे) हे कस्तुरबा रुग्णालयात कक्ष अधिकारी म्हणून कार्यरत होते. ते ३० ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त झाले. या निमित्ताने त्यांनी २८ ऑगस्ट रोजी आपल्या सहकाऱ्यांना प्रबोधनकार ठाकरे यांचे 'देव आणि देवळांचा धर्म' तसेच दिनकरराव जवळकर यांचे 'देशाचे दुश्मन' या पुस्तकांचे वाटप केले होते. यानंतर २९ ऑगस्ट रोजी रुग्णालयाच्या सहाय्यक अधिसेविकेने राजेंद्र कदम यांना कक्षात बोलावले. तेथे अन्य महिला परिचारिका आणि अन्य कर्मचारी देखील उपस्थित होते.

या पुस्तकांमुळे आमच्या भावना दुखावल्या असे सांगत महिलांनी राजेंद्र कदम यांना असे पुस्तक का वाटले? म्हणून जाब विचारला. महिला आक्रमक झाल्याने कदम यांनी हात जोडून माफी मागितली. परंतू त्यानंतरही त्यांच्या अंगावर प्रबोधनकारांचे पुस्तक फेकून मारण्यात आले. राजेंद्र कदम यांनी रुग्णालय प्रशासनाकडे याबाबत तक्रार केली. मात्र रुग्णालयाने कारवाई न केल्याने अखेर कदम यांनी आग्रीपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या घटनेमुळे राजकारण तापले आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी याप्रकरणी संताप व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, 'हा मुर्खपणा आहे. मुर्खपणाच्या सगळ्या हद्दी पार केल्यानंतर जे होऊ शकतो तो हा प्रकार आहे. मुळात यांना प्रबोधनकार माहिती आहेत का? त्यांनी प्रबोधनकार वाचले आहेत का? प्रबोधनकारांनी महाराष्ट्राला सुधारणावादी गोष्टींकडे नेले. समाजातील अनिष्ट प्रथांविरोधात त्यांनी लढा दिला. त्या प्रबोधनकारांचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आहे, असे मला वाटते.

तसंच, 'सनातन धर्माच्या नावाखाली काही लोक समाजात विष पेरण्याचा प्रयत्न करत आहेत. हे समाजासाठी घातक आहे. यांना मुळात सनातन धर्म देखील माहिती नाही आहे. त्या महिलेने प्रबोधनकारांना हिंदूत्वविरोधी म्हणणे म्हणजे मुर्खपणा आहे. त्या महिलेची तक्रार आमचे पदाधिकारी योग्य पद्धतीने करतील.', असे संदीप देशपांडे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिवाळीआधीच मदत मिळणार-एकनाथ शिंदे

Chanakya Niti : आचार्य चाणक्यांचा या ५ गोष्टी करा आत्मसात, १६-३० वयात पैशांची चणचण जाणवणारच नाही

Accident News : मुंबईत अपघाताचा थरार, टेम्पोची बससह अनेक वाहनांना धडक; ७ जणांना उडवले

Breaking News: शेतकऱ्यांसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी मदत, २५३ तालुक्यांना सरसकट नुकसान भरपाई; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Nashik Corporation : नाशिक महापालिकेसाठी ९ वर्ष जुन्या प्रभाग रचनेलाच मंजुरी; निवडणूक ठरणार चुरशीची, कोणत्या पक्षाला होणार फायदा?

SCROLL FOR NEXT