ED raids in Mumbai Saam TV
मुंबई/पुणे

ED Raids in Mumbai: छत्तीसगड ऑनलाइन सट्टेबाजी प्रकरणाचे मुंबई कनेक्शन? ईडीकडून मालाडमध्ये छापेमारी

साम टिव्ही ब्युरो

सचिन गाढ, साम टीव्ही

Mumbai Crime News: छत्तीसगड ऑनलाइन सट्टेबाजी प्रकरणाचे मुंबई कनेक्शन असल्याचा संशय सक्तवसुली संचलनायलय म्हणजेच ईडीला आहे. यावरून ईडीने मंगळवारी (२९ ऑगस्ट) रात्रीच्या सुमारास मुंबईच्या मालाड परिसरात छापेमारी केली आहे. महादेव बेटिंग ॲपशी जोडलेल्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या कार्यालयावर ईडीने ही छापेमारी केल्याची माहिती आहे. (Latest Marathi News)

छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) ५४० कोटी रुपयांचा कथित कोळसा घोटाळा आणि २,१६१ कोटींचा मद्य विक्री घोटाळा झाल्यानंतर ऑनलाइन सट्टेबाजीचे प्रकरण समोर आले आहे. सट्टेबाजीला मदत करणाऱ्या महादेव ऑनलाइन बेटिंग प्रकरणात ईडीने बुधवारी (२३ ऑगस्ट) चार आरोपींना अटक केली.

सट्टेबाजी करणारे मुख्य आरोपी दुबईमधून ‘महादेव बुक’ या ऑनलाइन सट्टेबाजीचा कारभार सांभाळतात, त्यांनी आतापर्यंत पाच हजार कोटी रुपये या घोटाळ्यातून जमवले असल्याचा आरोप करण्यात येत आहे. छत्तीसगड विधानसभा निवडणुकीला काही महिने शिल्लक असताना लागोपाठ तीन घोटाळ्यांचे आरोप झाल्यामुळे छत्तीसगडचे राजकारण ढवळून निघाले आहे.

१८ सप्टेंबरला महादेव बुक कडून दुबई येथे भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यासाठी तब्बल ४० कोटी रुपये इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला मोजल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. त्याचबरोबर या सट्टेबाजी प्रकरणाचे मुंबई कनेक्शन असल्याचा संशय देखील तपास यंत्रणांना आहे. यावरून ईडीने बुधवारी रात्रीच्या सुमारास मुंबईत ठिकठिकाणी छापेमारी केली.

दरम्यान, छत्तीसगड पोलिसांनी (Police) या सट्टेबाजीविरोधात २०२१ मध्ये कारवाई केली होती. तेव्हापासून ७५ एफआयआर नोंदविण्यात आले असून देशभरातून ४२९ लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. १९१ लॅपटॉप, ८५८ स्मार्टफोन आणि सट्टेबाजीशी निगडित सामान, महागड्या गाड्या आणि अडीच कोटी रुपयांची रोकड छत्तीसगड पोलिसांनी आरोपींकडून जप्त केलेली आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: सांगली.. प्रभाकर पाटील कमळ ऐवजी घड्याळ घेऊन उतरणार मैदानात !

Viral Video : क्लास रूमध्ये पोरींचा जोरजोरात वाद, पोराला राग अनावर, डेस्कवरुन उठला अन्...

Ajinkya Rahane: योगायोग की आणखी काही...; टीम इंडिया फ्लॉप ठरताच अजिंक्य रहाणेने केली सूचक पोस्ट, म्हणाला...!

Jharkhand Assembly Election : जागावाटप ठरलं! काँग्रेस २९ तर झामुमो 43 जागांवर लढणार, RJD ला किती जागा मिळाल्या?

APY Scheme: दररोज ७ रुपये गुंतवा अन् ५ हजारांची पेन्शन मिळवा; अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक कशी करायची?

SCROLL FOR NEXT