Mumbai Congress Protest Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Congress Protest: मदर डेअरीच्या जागेवरून काँग्रेस आक्रमक, अदानी समूहाविरोधात कुर्ल्यात आंदोलन; पाहा VIDEO

Congress Protest Against Adani Group: मदर डेअरची जागा अदानी समूहाला देण्यात आल्यामुळे काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. खासदार वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली कुर्ल्यामध्ये काँग्रेसचे आंदोलन सुरू आहे.

Priya More

मुंबई काँग्रेसच्या वतीने आज राज्य सरकार आणि अदानी समुहाविरोधात जाहीर निषेध मोर्चा सुरू आहे. मुंबईतल्या कुर्ल्यामध्ये हा मोर्चा सुरू आहे. मदर डेअरीच्या जागेवरून काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. मदर डेअरीच्या जागावर गार्डन बनवण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. मदर डेअरची जागा अदानी समूहाला देण्यात आल्यामुळे काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. सरकराने अजून ५८ एकर जमीन अदानी समूहाला दिली आहे. अशामध्ये आता कुर्ल्यातल्या मदर डेअरची जागा अदानीच्या घश्यामध्ये घालण्याचे काम सरकार करत असल्याचे म्हणत काँग्रेसने निषेध केला आहे.

मदरडेअरी मध्ये बोटॅनिकल गार्डन व्हावे हा तेथील स्थानिक नागरिकांचा प्रस्ताव डावलून सदर भूखंड अदानीच्या घशात घालण्याच्या निषेधार्थ मुंबई काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले आहे. खासदार वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली कुर्ला नेहरू नगर येथे आंदोलन करण्यात आले. वर्षा गायकवाड यांनी धरणे आंदोलन केले.

यावेळी पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप वर्षा गायकवाड यांनी केला आहे. मदर डेअरमध्ये जाण्यापासून वर्षा गायकवाड आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना अडवण्यात आले. त्यामुळे वर्षा गायकवाड यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत घटनास्थळी धरणे आंदोलन सुरु केले आहे. जोपर्यंत पोलिस आम्हाला आत सोडत नाही तोपर्यंत आम्ही धरणे आंदोलन करणार असे देखील त्यांनी ठामपणे सांगितले.

कुर्ला नेहरूनगर या परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तसेच 'लाडक्या मित्रास मोफत भूखंड, जी जमीन शासनाची ती जमीन अदानीची', अशा आशयाचे पोस्टर यावेळी काँग्रेस आंदोलकांनी झळकावले. आम्ही आंदोलन मागे घेणार नाही इथेच बसणा असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

'ही जमीन कुर्लाकरांची आहे त्यांना ती मिळाली पाहिजे. इथे गार्डन झालेच पाहिजे.', असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले. मुंबई पोलिस कुणासाठी काम करतेय, असा संतप्त सवाल वर्षा गायकवाड यांनी केला आहे. अदानीसाठी हे सर्व चालले आहे. हा देश लोकांसाठी आहे की अदानीसाठी आहे असा देखील प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Death: पोलीस दलात आत्महत्येचं सत्र काही थांबेना! ४ दिवसात ३ आत्महत्या, काय आहे कारण?

Mahalaxmi Vrat 2025 : महालक्ष्मी व्रताची तारीख, पूजा विधी, महत्व घ्या जाणून

Maharashtra Live News Update: ते वक्तव्य करून अजित पवारांकडून मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न; राम शिंदेंचा आरोप

Gunfire Shooting : क्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार! तिघांचा जागीच मृत्यू, आठजण जखमी

Astro Tips: सकाळी उठल्यावर आरशात पाहणे शुभ असते की अशुभ?

SCROLL FOR NEXT