Mumbai  Saam tv
मुंबई/पुणे

मान्सूनपूर्व पावसातच मुंबईची दैना; काँक्रिटची मुंबई पावसात बुडणार? video

Mumbai Rain update : मुंबईतील नागरिकांना रस्त्यावरील खड्ड्यांची समस्या भेडसावू नये म्हणून महापालिका प्रशासनानं काँक्रिटच्या रस्त्यांचा मार्ग स्वीकारला. मात्र शहरातील हेच काँक्रिटीकरण मुंबईला जलसमाधी देण्यास कारणीभूत ठरू शकतं? मुंबई काँक्रिटमुळे कशी बुडणार? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Saam Tv

रोहित कदम, साम टीव्ही

स्वप्नांची नगरी असलेल्या मुंबईत सिमेंटचे रस्ते आणि पेव्हर ब्लॉकच्या विळख्यात आज मुंबईकरांचा श्वास पार गुदमरून गेलाय. अशातच आता मान्सूनपूर्व पावसाच्या पहिल्याच सरीत मुंबईच्या काही भागांत पाणी साचलं..पावसात मुंबई जलमय होणं हे गेल्या काही वर्षांपासून कायमच चित्र आहे आणि दरवर्षी यात वाढच होतेय. याच महत्वाचं कारण आहे शहराचं वाढत काँक्रिटीकरण..

मुंबईतल्या 66 टक्के रस्त्यांच्या बाजूला पेव्हर ब्लॉक बसवण्यात आलेत. तसंच, 60 टक्क्यांहून अधिक जमीन सिमेंटच्या थराखाली गाडली गेलीये. तर शहरातील 81 टक्के मातीची जमीनच नष्ट झालीये. इतकंच नव्हे तर मुंबईतील पुनर्रोपण केलेली 70 टक्के झाडं नष्ट झालीयेत.

याच क्रॉकीटचा परिणाम तापमानवाढीवर झालाय. कधी काळी कमाल तापमान जास्तीत जास्त २५ पर्यंत असणाऱ्या मुंबईतील तापमान आता ३९- ४० डिग्री सेल्सिअसपर्यंत गेलय.

मुंबईत ७० टक्के कॉक्रीटीकरण झालंय ..आणि याचेच परिणाम आता दिसू लागेल आहेत. उन्हाळ्यातल्या तापमान वाढीनंतर आता पाणी शोषण क्षमताही कमी झाल्यानं पावसाळ्यात पाण्याचा निचरा होणं ही कठीण असेल..त्यामुळे या पावसाळ्यातही मुंबईची तुंबई झालेली दिसली तर त्यात विशेष काही नाही....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

अमरावतीत भीषण अपघात! हायड्रा क्रेनने ५ जणांना उडवले; तिघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

Veg Kolhapuri Recipe: सुट्टीच्या दिवशी घरच्या घरी बनवा धाबा स्टाईल झणझणीत व्हेज कोल्हापुरी, वाचा खास रेसिपी

Bedsheet Washing Tips: उन्हाळ्याच्या दिवसात बेडवरील चादर किती दिवसात धुतली पाहिजे?

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात खा नाचणीचा डोसा, चवही भन्नाट अन् आरोग्यही राहील उत्तम

SCROLL FOR NEXT