Mumbai Coastal Road Saam
मुंबई/पुणे

गुजरातची BMW कोस्टल रोडवरून ५० फूट खाली कोसळली; गाडीचा चेंदामेंदा, आर्किटेक्चर-इंजिनिअरिंगच्या ३ तरुणांचा जागीच मृत्यू

BMW Accident : मुंबईच्या कोस्टल रोडवर गुजरातच्या विद्यार्थ्यांची भरधाव BMW पुलावरून ५० फूट खाली कोसळली. भीषण अपघातात तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे.

Namdeo Kumbhar

मुंबईतील कोस्टल रोडवर रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास एक अत्यंत थरकाप उडवणारा अपघात घडला. गुजरातहून मुंबईत शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची भरधाव बीएमडब्ल्यू (BMW) कार कोस्टल रोडच्या पुलावरून थेट ५० फूट खाली कोसळली. या भीषण दुर्घटनेत कारचा पार चेंदामेंदा झाला असून, तीन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर एकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.

नेमकी घटना कशी घडली?

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही बीएमडब्ल्यू कार मरीन ड्राईव्हवरून हाजी अलीच्या दिशेने अत्यंत वेगाने जात होती. कोस्टल रोडवर लाला कॉलेजसमोर आणि लोटस जेट्टीजवळ आली असता, अतिवेगामुळे चालकाचा कारवरील ताबा सुटला. नियंत्रण सुटलेली गाडी पुलाचा कठडा तोडून थेट ५० फूट खाली कोसळली. अपघात इतका भीषण होता की गाडीचा पूर्णपणे चुराडा झाला.

गुजरातच्या विद्यार्थ्यांवर काळाचा घाला

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बीएमडब्ल्यू कार ही सिल्वासा (गुजरात) पासिंगची आहे. गाडीतील चारही तरुण गुजरातच्या अहमदाबाद येथील रहिवाशी आहेत. ते मुंबईत उच्च शिक्षणासाठी आले होते. मृतांमध्ये एक आर्किटेक्चर आणि एक इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असल्याचे समोर आले आहे.

नायर रुग्णालयाकडून मिळालेली अपडेट

घटनेची माहिती मिळताच कोस्टल रोड कंट्रोल रूम आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सर्व जखमींना तात्काळ नायर रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी (CMO) दिलेल्या माहितीनुसार, शानय गज्जल (वय २१ वर्षे), धिर्या सेठ (वय १७ वर्षे) आणि आणखी एका तरूणाचा जागीच मृत्यू झाला होता. तर एकाची प्रकृती गंभीर आहे. त्याच्या रुग्णालयाच्या ट्रॉमा वॉर्डमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

कुटुंबियांना माहिती दिली, पोलीस तपास सुरू

पोलीस प्रशासनाकडून घटनेचा रीतसर पंचनामा करण्यात आला असून, मृत व जखमी विद्यार्थ्यांच्या गुजरात येथील कुटुंबियांना या दुर्घटनेची माहिती देण्यात आली आहे. अतिवेगामुळेच हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

Guava Leaves Benefits for Eye Stye : डोळ्याला रांजणवाडी आली असेल तर पेरूच्या पानांचा सोपा उपाय करा; मिळेल त्वरित आराम

कोल्हापुरात प्रेमसंबंधातून थरारक घटना; अपहरण केलं नंतर प्रेयसीला खोल दरीत ढकललं!

Raw Garlic Benefits: सकाळी कच्चा लसूण खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात?

SCROLL FOR NEXT