Cm Eknath Shinde Helped to Disabled Man Saam Tv
मुंबई/पुणे

CM Relief Fund: याला म्हणतात मुख्यमंत्री! अपघातात हात-पाय गमावलेल्या मुलाला भेटले अन् तात्काळ केली 5 लाखांची मदत

Mukhyamantri Sahayata Nidhi: याला म्हणतात मुख्यमंत्री! अपघातात हात-पाय गमावलेल्या मुलाला भेटले अन् तात्काळ केली 5 लाखांची मदत

साम टिव्ही ब्युरो

Cm Eknath Shinde Helped to Disabled Man: मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी नेहमीच गर्दी असते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सामान्यांना भेटून त्यांच्या निवेदनावर, अर्जावर कार्यवाहीचे निर्देशही देतात.

यातच आज मुख्यमंत्री शिंदे यांना आज अपघातात दोन्ही पाय, एक हात गमावलेला बांधकाम मजूर मदत मागणीसाठी आला होता. त्याला क्षणाचाही विलंब न लावता मदतीचा पाच लाखांचा धनादेश मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या वागणुकीने भारावून गेलेल्या संदेशच्या आणि त्याच्या वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.

मुख्यमंत्री मंत्रालयात बैठकीसाठी आल्यावर त्यांना भेटण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून सामान्य नागरिक येत असतात. त्यांना प्रत्येकाला भेटल्याशिवाय मुख्यमंत्री शिंदे मंत्रालय सोडत नाही. सामान्यांसाठी कल्याणकारी योजना राबवितानाच त्याची गतिमान अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे नेहमीच आढावा बैठकांमधून प्रशासनाला निर्देशही देत असतात. (Latest Marathi News)

आज दुपारी बाराच्या सुमारास मुख्यमंत्र्यांचे मंत्रालयात आगमन झाले. नियोजित बैठका सुरू झाल्या. लोकप्रतिनीधी, सामान्य नागरिक देखील त्यांना भेटायला आले होते. या गर्दीत पालघर जिल्ह्यातील जव्हारचा संदेश पिठोले त्याच्या वडिलांसह मुख्यमंत्र्यांना भेटायला आला होता. मुख्यमंत्र्यांचे लक्ष व्हिलचेअरवर बसलेल्या संदेशकडे गेले.

विधी व न्याय विभागाच्या आढावा बैठकीसाठी जात असताना संदेशजवळ थांबून मुख्यमंत्र्यांनी त्याची विचारपूस केली आणि ते समिती कक्षात आले. विधी व न्याय विभागाचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी संदेशला बोलावले. त्याच्याकडून संपूर्ण माहिती जाणून घेतली.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी संदेशला तातडीने मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून मदत देण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. सबंधित अधिकाऱ्यांना बोलावले. तात्काळ संपूर्ण प्रक्रिया झाली. धनादेशावर संबंधित अधिकाऱ्यांनी तिथेच मुख्यमंत्र्यांसमोरच स्वाक्षरी केली आणि संदेशच्या हातात पाच लाखाचा धनादेश मुख्यमंत्र्यांनी सुपूर्द केला.

बांधकाम मजूर असलेल्या संदेशचा कामावर असताना अपघात झाला त्यात त्याचा एक हात आणि दोन्ही पाय गमावले. आपल्या तरुण मुलाला व्हिलचेअरवरून आणाव्या लागलेल्या पित्याला मुख्यमंत्र्यांनी दिलासा देत तातडीने मदतीचा धनादेश दिला.

शिवाय संदेशला कृत्रिम पाय, हात बसविण्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे मंगेश चिवटे यांना समन्वय करण्याच्या सूचनाही दिल्या. व्यवसायासाठी स्टॉल सुरू कर. त्यासाठी पालघर येथे जागा देण्यासाठी मदत करतानाच बांधकाम महामंडळाकडून संदेशला मदत देण्याबाबतही कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadanvis : मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, पाहा Video

Ladki Bahin Yojana : ... तर याला मी लाच म्हणेल, लाडकी बहीण योजनेवर राज ठाकरे काय म्हणाले?

Praniti Shinde : भाजपचे आमदार फक्त जीआरवर, अस्तित्वात नाही; खासदार प्रणिती शिंदे यांची आमदार कल्याणशेट्टींवर टीका

New Marathi Movie: 'वाढलेलं वय अन् लग्नाची जुळवणी', सुबोध भावे अन् तेजश्रीनं घातला घाट; ट्रेलरने उत्सुकता वाढवली

MNS Manifesto: आम्ही हे करु! गडकिल्ले, रोजगार ते महिलांची सुरक्षा, मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध!

SCROLL FOR NEXT