Mumbai Central Local Train 
मुंबई/पुणे

Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात ओव्हर हेड वायर तुटली, मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली, मुंबईकरांचे भर पावसात हाल

Mumbai Central Local Train: CSMT च्या दिशेने जाणारी जलद मार्गावरील वाहतूक खोळंबली आहे. 9. 55 वाजता ओवर हेड वायर तुटल्याची घटना घडल्यानं वाहतूक विस्कळीत झालीय.

Bharat Jadhav

मुंबई लोकलची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेच्या मार्गावरील ओवर पेंटग्राम , ओवर हेड वायर तुटल्याने वाहतूक खोळंबली आहे. मध्य रेल्वेच्या कुर्ला स्थानकामध्ये ओवर पेंटग्राम , ओवर हेड वायर तुटली असल्यानं CSMTकडे जाणारी जलद रेल्वे मार्गाची वाहतूक खोळंबली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 9.55 वाजता वायर हेड तुटल्याची घटना घडलीय. यामुळे जलद मार्गावरची वाहतूक खोळंबली आहे. कुर्ल्याच्या पुढे कल्याण दिशेने ट्रेन एका पाठोपाठ उभ्या आहे. यामुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यास विलंब लागण्याची शक्यता आहे. सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाल्याने रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

ज्या ठिकाणी म्हणजे फलाट 6 वर रेल्वे वाहतूक बंद पडली आहे. त्या मार्गावरील सीएसएमटीकडे जाणारी लोकल ट्रेन वाहतूक पुढील सूचना मिळेपर्यंत बंद असणार आहे. कल्याणवरून csmt जाणाऱ्या सर्व ट्रेन 4 वरून वळवण्यात आल्या आहेत. सोमवारी रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास कुर्ला आणि सायन स्थानकांदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली. त्यामुळे आसनगाव, कर्जत आणि अंबरनाथकडे जाणाऱ्या गाड्या रात्री उशिराने धावत होत्या.

अनेक प्रवाशांनी बराच वेळ लोकलची वाट पाहावी लागत असल्याची तक्रार केली. तसेच वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडांबद्दल निराशा व्यक्त केली. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी इतर लोकल गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर वळवण्यात आल्या. तुटलेली ओव्हर हेड वायर ४० मिनिटांत दुरुस्त करण्यात आली आणि रात्री ११ वाजण्याच्या सुमारास अप स्लो लाईनवरील लोकल सेवा पूर्ववत करण्यात आल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मावळमध्ये एसटी बस आणि खासगी बसचा अपघात, 11 प्रवासी जखमी

Mumbai Metro: ठाणे ते गेट वे ऑफ इंडिया; आणखी एका मेट्रोचा प्रस्ताव, 13 ठिकाणी असणार स्टॉप

Save Electricity : AC सोबत फॅन लावावा का? वाचा वीज वाचवण्याच्या टिप्स

Pune News: पुण्यामध्ये पोलिस अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू, फुरसुंगी रेल्वे क्रॉसिंगजवळ ट्रेनने दिली धडक

Political Explainer : ठाकरेंनंतर एकनाथ शिंदेंचाही भीमशक्ती-शिवशक्तीचा प्रयोग; कुणाची ताकद वाढणार?

SCROLL FOR NEXT