नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईत भीषण अपघात
आरे कॉलनीत बेस्ट बस आणि ट्रकची जोरदार धडक
ट्रक चालकाचा जागीच मृत्यू
मुंबईतील बेस्ट बसवरली अपघाताची साडेसाती लागलीय. दोन दिवसापूर्वीच भांडुपमधील रेल्वे स्टेशनजवळ बेस्ट बसचा अपघात झाला होता. आज पुन्हा बेस्ट बसचा अपघात झालाय. मुंबईतील आरे कॉलीनीमध्ये एक ट्रक आणि बेस्ट बसची धडक होत अपघात झालाय. हा अपघात सकाळी ६.२० वाजता आरे कॉलनीच्या गेट क्रमांक ५ वर जवळ अपघात घडलाय.
या अपघातात ३० वर्षीय ट्रक चालकाचा मृत्यू झाला, तर बस चालक आणि कंडक्टर जखमी झालेत. अपघातानंतर बस चालक, कंडक्टर आणि ट्रक चालक या तिघांनाही तातडीने जोगेश्वरी पूर्वेतील ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. टायर घसल्यानं ट्रक बसकडे वळला.त्यानंतर ट्रक बस ड्रायव्हरच्या केबिनजवळील पुढच्या भागावर आदळला. नवीन वर्षाच्या दिवशी पहाटेच मुंबईतील आरे कॉलनी येथे एका ट्रक आणि बेस्ट बसची धडक झाली. यामध्ये ट्रक चालकाचा मृत्यू झाला आणि बस कंडक्टर आणि चालक जखमी झालेत.
ही घटना सकाळी ६.२० च्या सुमारास आरे कॉलनीच्या गेट क्रमांक ५ जवळ घडली. विक्रोळी डेपोची A-४७८ क्रमांक ३३ या मार्गावर चालणारी बस बोरिवली स्टेशनकडे जात होती. त्यावेळी ट्रक आणि बसचा अपघात घडला. अधिकाऱ्यांने दिलेल्या माहितीनुसार, धडक देणारा ट्रक बसच्या विरुद्ध दिशेने येत होता. सकाळी मुंबईत झालेल्या रिमझीम पावसामुळे रस्ते निसरडे झाले होते. त्या रस्त्यावरूनच ट्रक येत होता. त्यावेळी ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यात ट्रकचा टायर घसरला आणि ट्रक बसकडे वळाला. त्यानंतर ट्रक ड्रायव्हरच्या केबिनच्या समोरील भागावर धडकला.
अपघातात बेस्ट बस चालक आणि कंडक्टर जखमी झालेत. चालकाचे नाव मोहम्मद रफिक शेख (४८) असून त्यांना बसच्या समोरील काचा तुटल्या. त्या काचा त्यांच्या डोक्यात घुसल्या. त्यांच्या उजव्या पायाला आणि गुडघ्याला दुखापत झाली आहे. तर रवींद्र पांडुरंग शेंबाडकर (५६) असं जखमी कंडक्टरचे नाव आहे. त्यांच्या डाव्या हाताला आणि डाव्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे. यात भीषण अपघातात खासगी ट्रक चालकाचा मृत्यू झालाय. चेहराज ठाकूर (३०), असं ट्रक चालकाचे नाव आहे. तो गुजरातचा रहिवासी होता, त्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याच्यावर उपचार चालू असताना त्याचा मृत्यू झाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.