Six People Drowned in Sea at Juhu Chowpatty Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Breaking News: मुंबईतील जुहू चौपाटीवर पाच जण बुडाले

मुंबईतील जुहू चौपाटीवर पाच जण बुडाले

साम टिव्ही ब्युरो

>> संजय गडदे

Juhu Chowpatty Six People Drowned: मुंबईचा प्रसिद्ध अशा जुहू चौपाटीवर सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पाच जण समुद्रात बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे सहाजण बुडाले.

यातील एकाला स्थानिक नागरिकांच्या मदतीने वाचवण्यात यश आले. मात्र चार जण गायब असून नौदल व अग्निशमन दलामार्फत शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या पाची मुलं 12 ते 15 वयोगटातील असल्याची माहीती मिळाली आहे.

दोन दिवसापासून अरबी समुद्रात भोंगावणाऱ्या बिपरजॉय चक्रीवादळामुळे मुंबई सह कोकण किनारपट्टीवर लाटांचे तांडव पाहायला मिळत आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे मुंबईतील समुद्रकिनाऱ्यावर जाणे टाळावे, असा इशारा मुंबई महानगरपालिकेने दिला आहे. (Latest Marathi News)

तरीही सोमवारी सायंकाळी पाच साडेपाच वाजण्याच्या सुमारास काही तरुण जुहू कोळीवाडा येथे समुद्रात उतरले. समुद्रात तुफान असल्यामुळे उतरू नये, असा सल्ला स्थानिक नागरिकांनी दिला होता. पण स्थानिकांची नजर चुकवून हे तरुण समुद्रात गेल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पाचही जण बुडाले यातील एकाला स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलासह नौदलाला पाचारण करण्यात आले. सध्या या चौघांचा शोध सुरू आहे. दरम्यान घटनास्थळी रुग्णवाहिकेसह पोलिस, अग्निशमन दल, मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी समुद्रकिनारी तैनात करण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Scenic Train Journey: भारताच्या या ८ रेल्वेतून प्रवास करा अन् स्वर्गसुखाचा आनंद लुटा

Pune Ganeshotsav: विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी 'डीजे'ला परवानगीची गरज नाही, पोलिस आयुक्त काय म्हणाले?

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Cabinet Decisions : मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ मोठे निर्णय; १० जिल्ह्यात 'उमेद मॉल' अन् बरेच काही

Nashik : कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक; अधिकारी न भेटल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कांदे फेकून आंदोलन

SCROLL FOR NEXT