मुंबई, ता. २० ऑगस्ट २०२४
बदलापूरमधील नामांकित शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची घटना घडल्याने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करत संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. या प्रकरणावरुन शिवसेना ठाकरे गटाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी बलात्काऱ्याला दहशतवाद्यासारखी वागणूक द्या अशी मागणी करत संताप व्यक्त केला आहे.
दररोज आम्ही महिलांसाठी "सेल्फ डिफेन्स क्लासेस" सुरू करण्याचा विचार करतो, जसे की आम्ही पूर्वी केले होते, एक खोल आवाज मला विचारतो का? आम्ही लवकरच सुरू करणार असलो तरी, तरीही प्रश्न का आहे? सुरक्षेची जबाबदारी महिलांवर का असावी?समाज आणि कायदा महिलांच्या सुरक्षिततेची खात्री का देऊ शकत नाही? विनयभंग, बलात्काराच्या घटना आपल्याला देशभरातून रोज ऐकायला मिळतात ज्यामुळे आपल्याला राग येतो . जलद न्याय, निष्पक्ष न्याय आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी हीच आमची अपेक्षा आहे, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे.
मानवतेविरुद्धच्या गुन्ह्याला पूर्णपणे सहन न करण्याचे एक गंभीर उदाहरण म्हणजे बलात्कार. आज बदलापूर प्रकरण ऐकून मन हेलावणारे आहे. आणि पुन्हा एकदा, वयोगटांमध्ये फरक असू शकत नाही. बलात्कार हा बलात्कार असतो. मी पुन्हा एकदा राष्ट्रपती मुर्मू जी यांना विनंती करतो की त्यांनी महाराष्ट्र शक्ती विधेयकाला प्रलंबित संमती द्यावी, ज्यामुळे महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांवरील कायद्याचे सक्षमीकरण होईल. मी हे आधीही बोललो होतो आणि पुन्हा सांगतो, बलात्काऱ्याला दहशतवाद्यासारखी वागणूक द्या! अशी संतप्त मागणी त्यांनी केली आहे.
"आधी नवी मुंबई, आता बदलापूर ! बदलापुरात लहान मुलींवर जो प्रसंग ओढावला, तो अतिशय संतापजनक आहे. मी त्याचा तीव्र शब्दांत निषेध करतो. सध्या राज्यात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. महिलांवरील अत्याचारासाठी आपण दिल्ली नोएडा सारख्या भागांना नावे ठेवायचो आता महाराष्ट्राची परिस्थितीही तशीच होत चालली आहे.
"सरकार लाडक्या बहिणींच्या लेकींच्या सुरक्षेसाठी काय करत आहे? राज्यातील गृह खातं मूग गिळून का गप्प बसलंय? योजना आणली, पैसे वाटले म्हणजे तुमचे बाकीचे कर्तव्य संपलं? मुख्यमंत्री राहतात त्याच जिल्ह्यात मुली सुरक्षित नसतील तर राज्यातील इतर भागात तरी कशा सुरक्षित राहतील? हा खरा प्रश्न आहे. फक्त उद्घाटनं, सोहळे, चमकोबाजीमध्ये व्यस्त असणाऱ्या 'इव्हेंटजीवी' सत्ताधाऱ्यांनी लाडक्या बहिणीला न्याय देण्यासाठी पुढाकार घ्यावा," अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.