Ghatkopar Building Fire News: Saamtv
मुंबई/पुणे

Ghatkopar Fire News: मुंबईत अग्नितांडव! घाटकोपर परिसरातील इमारतीला भीषण आग; १३ जण जखमी

Ghatkopar Building Fire News: अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने 90 हून अधिक लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. तर या घटनेत १३ जण जखमी झाले आहेत.

Gangappa Pujari

Mumbai Ghatkopar Fire News: मुंबईमधून एक भीषण आगीची घटना समोर आली आहे. मुंबईतील घाटकोपर भागातील एका इमारतीला भीषण आग लागली असून यामध्ये १३ जण जखमी झाले आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आणण्यात आली. या दुर्घटनेतील १३ जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ९० हून अधिक लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुंबईतील घाटकोपर भागात एका इमारतीला भीषण आग लागल्याची घटना शनिवारी (ता. १४, सप्टेंबर) घडली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने 90 हून अधिक लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. तर या घटनेत १३ जण जखमी झाले आहेत. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घाटकोपर परिसरातील रमाबाई आंबेडकर मगसवर्गीय गृहनिर्माण संस्थेत ही आगीची घटना घडली आहे. हर्ष अनिल भिसे, स्वीटी संदीप कदम, जान्हवी मिलिंद रायगावकर, प्रियंका काळे, जसिम सलीम सय्यद, ज्योती मिलिंद रायगावकर, फिरोझा इक्बाल शेख, लक्ष्मी लक्ष्मण कदम, लक्ष्मण रामभाऊ कदम, मानसी श्रीवास्तव, अक्षरा सचिन शाह, दाते अशी जखमींची नावे आहेत.

दरम्यान, याआधी दोन दिवसांपूर्वीच मुलुंड परिसरात असलेल्या ओपल अपार्टमेंटच्या 9व्या मजल्यावर आग लागली होती. या दुर्घटनेत एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. घटनेनंतर वृद्ध महिलेला तात्काळ जवळच्या एम.टी. त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission : कामाची बातमी! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या टेक होम पगारात मोठी वाढ? सरकार लागू करू शकतं हा फॉर्म्यूला

Maharashtra News Live Update: जालन्यात पोलिस-महसूलच्या पथकाचा वाळू माफियांना दणका, 3 हायवा, ट्रॅक्टरसह 64 लाखांचा मुद्देमाल जप्त

वजन वाढणारच नाही! सकाळी नाश्त्याला अरबट-चरबट खाण्यापेक्षा खा 'हे' 4 हाय-प्रोटीन पदार्थ; दिवसभर राहाल फिट

Paranoia symptoms: प्रत्येक गोष्टीत कटकारस्थान दिसतंय? तज्ज्ञांनी सांगितली पॅरानोइयाची धोकादायक लक्षणं आणि कारणं

Helmet importance: बाईकवर फिरायला जाण्यापूर्वी हेल्मेटबाबत ही एक चूक टाळा

SCROLL FOR NEXT