Mehboob Sheikh Saamtv
मुंबई/पुणे

Mumbai News: आमदार निवासस्थानात गोंधळ! मेहबूब शेख अन् २ जणांमध्ये झटापट, नेमकं काय घडलं?

Maharashtra Politics: मुंबईतील आमदार निवासस्थानामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख आणि २ जणांमध्ये झटापट झाल्याची घटना घडली.

Gangappa Pujari

Maharashtra Political News:

मुंबईतील आमदार निवासस्थानामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख आणि २ जणांमध्ये झटापट झाल्याची घटना घडली. रात्री झोपले असताना दोघांनी येऊन झटापट केल्याची माहिती मेहबूब शेख यांनी साम टिव्हीशी बोलताना सांगितले आहे. या प्रकरणी एकमेकांविरुद्ध तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आमदार निवासामध्ये राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख (Mehboob Sheikh) आणि २ जणांमध्ये झटापटी झाल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रात्री झोपलेलो असताना दोघे जण दारुच्या नशेत आले.

त्यावेळी मेहबूब शेख आणि त्यांच्यात झटापटी झाल्याचे मेहबूब शेख यांनी सांगितले आहे. या प्रकरणानंतर एकमेकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याबाबत प्रकिया सुरू आहे. मेहबूब शेख यांच्यावर ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा, यासाठी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात (Marine Drive Police) तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मेहबूब शेख यांच्याशी फोनवरुन चर्चा करुन यासंबंधीची माहिती घेतल्याचेही सांगण्यात येत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सध्या सुरू आहे.(Latest Marathi News)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे- उद्या डॉक्टरांच्या संपाला तात्पुरती स्थगिती

Nagpur : नागपुरमध्ये भीषण अपघात! ई-रिक्षा उलटून महिलेचा मृत्यू, नवऱ्याविरोधात पोलिसांची कारवाई

Lionel Messi: इतिहास रचणाऱ्या लिओनेल मेस्सीला फायनलपूर्वी बसला मोठा धक्का, एम्बाप्पेने एका रात्रीत बदललं सगळं समीकरण

Gold Rate Today India : सोन्याचा भाव पुन्हा घसरला! 7 दिवसांत सोनं इतक्या रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे ताजे दर

Dal Tadka Recipe : संडे स्पेशल मेन्यू! घरी बनवा ढाबा स्टाईल डाळ तडका, चव अशी की सगळेच रेसिपी विचारतील

SCROLL FOR NEXT