Aadhar Card For Dogs Saamtv
मुंबई/पुणे

Aadhar Card For Dogs: अहो आश्चर्यच! 'या' विमानतळावर भटक्या कुत्र्यांना मिळाले आधारकार्ड; QR Code स्कॅन करताच मिळणार माहिती...

Gangappa Pujari

Mumbai Airport QR Code For Dogs: आधार कार्ड हे प्रत्येक भारतीयाचे सर्वात महत्वाचे ओळखपत्र आहे. सध्या कोणत्याही शासकीय कामासाठी आधारकार्ड असणे अनिवार्यच आहे. आता हेच आधारकार्ड कुत्र्यांसाठीही ओळखपत्र म्हणून देण्यात आले आहे.

मुंबई विमानतळाबाहेरी 20 भटक्या कुत्र्यांच्या कळपाला त्यांची ओळखपत्रे म्हणजे आधारकार्ड देण्यात आले आहे. त्यांच्या गळ्यात हे 'आधार' कार्ड घातले होते. यात एक QR कोड स्कॅन केल्यावर कुत्र्याच्या माहितीसह फीडरचा संपर्क तपशील - नाव, लसीकरण, नसबंदी आणि वैद्यकीय माहिती मिळते.

काय आहे कारण?

याबाबत अधिक माहिती अशी की, 'pawfriend.in' या उपक्रमाद्वारे कुत्र्यांसाठी युनिक आयडेंटिफिकेशन टॅग तयार करण्यात आले आहेत. सायन येथील अक्षय रिडलान या अभियंत्याने हा उपक्रम सुरू केला आहे. एखादे पाळीव प्राणी हरवले किंवा दुसरीकडे हलवले तर, QR कोड टॅग त्याला त्याच्या कुटुंबासोबत पुन्हा जोडण्यात मदत करू शकतो. हे बीएमसीला शहरातील भटक्या प्राण्यांचा केंद्रीकृत डेटाबेस राखण्यास मदत करू शकते.

या उपक्रमाबाबत सांगताना अक्षय म्हणाला की, "आम्ही सकाळी 8.30 च्या सुमारास सुरुवात केली आणि क्यूआर कोड टॅग निश्चित करण्यासाठी आणि लसीकरण करण्यासाठी कुत्र्यांचा पाठलाग करत होतो.काही तासांच्या धावपळीनंतर टीमने 20 कुत्र्यांना आधारकार्ड दिले गेले.

TOI नुसार, एका टीमने मोठ्या उत्साहात ओळखपत्रांना पुष्पहार घातला. कुत्र्यांना नियमितपणे चारा देणारी व्यक्ती त्यांना बोलावत होते, परंतु कुत्रे इतरांना त्यांच्या दिशेने येताना पाहून सावधगिरी बाळगत असत. काही तासांच्या धावपळीनंतर टीमने 20 कुत्र्यांच्या गळ्यात हे आधारकार्ड लटकावले (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT