Mumbai news Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai : फ्लॅट देण्याचं आमिष दाखवून कोट्यवधींना लुटलं, मुंबईतील बड्या बिल्डरचा कारनामा उघड

Mumbai Borivali Crime News : बोरिवली (पूर्व) येथील त्रिवेणी डेव्हलपर्सचे बिल्डर मिहीर व अशोक जेठवा यांनी गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली. दोन वर्षे फरार असलेल्या आरोपींना कस्तुरबा मार्ग पोलिसांनी केरळमध्ये अटक केली असून पुढील चौकशी सुरू आहे.

Alisha Khedekar

  • त्रिवेणी डेव्हलपर्सचे बिल्डर बाप लेकाला केरळमध्ये अटक

  • फ्लॅट व उच्च परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक

  • आरोपींवर १० पेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल

  • पोलिसांच्या गुप्त कारवाईमुळे मोठा घोटाळा उघड

संजय गडदे, मुंबई

Mumbai Crime: बोरिवली (पूर्व) परिसरातील नागरिकांची आणि गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या त्रिवेणी डेव्हलपर्सचे बिल्डर पिता–पुत्र या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मिहीर जेठवा आणि अशोक जेठवा यांना कस्तुरबा मार्ग पोलिसांनी केरळमधून शिताफीने ताब्यात घेतले. कस्तुरबा मार्ग पोलीस ठाणे बोरिवली पोलीस ठाणे आणि एम एस बी या तीन ठिकाणी या दोघा पिता पुत्रांविरोधात एकूण दहा गुन्हे नोंद आहेत.दोघेही मागील दोन वर्षांपासून फरार होते.

फिर्यादी नवीनचंद्र गोरधनदास भरखडा (69) यांनी 31 मार्च 2019 ते 31 मार्च 2020 दरम्यान 2% मासिक परतावा आणि बोरिवलीतील न्यू शिवकृपा CHS मध्ये फ्लॅट देण्याचे खोटे आश्वासन देत 1 कोटी 17 लाख रुपये घेतल्याची तक्रार दाखल केली होती. पैसे परत न करता फसवणूक केल्याप्रकरणी गु.र.क्र. 177/2025 अन्वये जेठवा कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल झाला होता.

तांत्रिक तपास, बातमीदारांची माहिती आणि सततच्या पाठपुराव्यामुळे आरोपी केरळातील एर्नाकुलम जिल्यात वेगवेगळ्या ठिकाणी नाव बदलून राहत असल्याचे समोर आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राहुल पाटील, सरला थोरात व पथकाने कोची येथे सापळा रचून दोन्ही आरोपींना अटक केली.

आरोपींवर कस्तुरबा मार्ग व बोरीवली पोलीस ठाण्यात फसवणूक, विश्वासघात, धमकी, मोफा कायदा उल्लंघन, ठेवीदार संरक्षण अधिनियम आदी कलमांखाली एकूण १० हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच न्यायालयाने जारी केलेली अटक वॉरंटदेखील प्रलंबित होती.

ही कारवाई पोलीस उप आयुक्त महेश चिमटे, सपोआ मालोजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कस्तुरबा मार्ग पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे गुंतवणूकदारांची मोठी फसवणूक करणाऱ्या बिल्डरांच्या टोळीचा पर्दाफाश झाला असून आणखी पीडित पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satbara : सातबारा आता फक्त १५ रूपयात, तलाठ्याच्या सहीची गरज नाही

Rohit Sharma: भर मैदानात रोहित शर्माने काय मागितली इच्छा? हिटमॅनचा जवळचा मित्र अभिषेक नायरने केला खुलासा

LPG Gas Cylinder: फक्त ३०० रूपयांत गॅस सिलिंडर, राज्य सरकारची मोठी घोषणा, लाखो लोकांना होणार फायदा

'अहो आज रात्री तरी..' नवरा दूर-दूर, बायकोकडून शरीरसंबाधासाठी पुढाकार, पतीनं गुप्तांगाला चटके देत केला छळ

Gold Price Today : सोन्याच्या किंमतीत अचानक घसरण, इतकं झालं स्वस्त, वाचा २४ आणि २२ कॅरेटचे आजचे दर

SCROLL FOR NEXT