Mumbai Borivali National Park Bittu Leopard Death Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai : मुंबईतील बिट्टू बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू; प्राणी प्रेमींकडून हळहळ

Mumbai Borivli National Park Leopard : मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधील ‘बीट्टू’ या बिबट्याचा दीर्घकालीन किडनी आजारामुळे मृत्यू झाला. वन्यजीव प्रेमींमध्ये शोककळा पसरली असून उपचार असूनही त्याला वाचवता आले नाही.

Alisha Khedekar

  • ‘बीट्टू’ हा ६ वर्षीय नर बिबट्या होता

  • २०१९ मध्ये येऊरमधून त्याचा बचाव करण्यात आला होता

  • त्याला पॉलीसिस्टिक किडनी डिसीज हा गंभीर आजार होता

  • २१ मार्च २०२६ रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला

  • वन्यजीव प्रेमींमध्ये या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे

संजय गडदे, मुंबई

Mumbai Borivali National Park Bittu Leopard Death मुंबईतील बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये ठेवण्यात आलेल्या ‘बीट्टू’ या ६ वर्षांच्या नर बिबट्याचा दीर्घकालीन आजारामुळे २१ मार्च २०२६ रोजी मृत्यू झाला. या घटनेमुळे वन्यजीव प्रेमींमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

बीट्टू हा ८ डिसेंबर २०१९ रोजी ठाणे वनविभागाच्या येऊर परिसरातून बचाव करण्यात आलेला बिबट्या होता. काही दिवस उपचार आणि निगराणीनंतर त्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील प्राणिवैद्यकीय विभागाच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. उद्यानातील पशुवैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून त्याची नियमित काळजी घेतली जात होती.

मागील काही महिन्यांपासून बीट्टूमध्ये आजाराची लक्षणे दिसत होती. त्याच्यावर आवश्यक वैद्यकीय उपचार सुरू होते. सोनोग्राफी तपासणीत त्याला पॉलीसिस्टिक किडनी डिसीज हा गंभीर आजार असल्याचे निदान झाले होते. उपचार सुरू असूनही त्याच्या प्रकृतीत सातत्याने बिघाड होत होता.

अखेर २१ मार्च रोजी त्याच्या प्रकृतीत गंभीर गुंतागुंत निर्माण झाल्याने त्याचा मृत्यू झाला. पशुवैद्यकीय पथकाने केलेल्या शवविच्छेदनात मूत्रपिंडामध्ये सिस्ट आढळून आल्याची माहिती देण्यात आली आहे. प्राथमिक तपासणीत संसर्गजन्य कारणांपेक्षा दीर्घकालीन आजारामुळे मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, सर्व आवश्यक प्रोटोकॉलचे पालन करण्यात आले असून पुढील हिस्टोपॅथॉलॉजिकल आणि पुष्टीकरणात्मक तपासणीसाठी जैविक नमुने मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ येथे पाठवण्यात आले असल्याची माहिती उद्यान प्रशासनाने दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Best Teas For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी 5 चहा ठरतील फायदेशीर; जाणून घ्या कोणते आहेत?

Ukadiche Modak Recipe : उकडीचे मोदक फाटतात? 'ही' ट्रिक वापरा, प्रत्येक मोदक बनेल परफेक्ट

Maharashtra News Live Update: कृष्णराज महाडिक नेमके काँग्रेसचे की भाजपचे?

कॅबिनेट मंत्र्यांचं निधन, मध्यरात्री आला हार्ट अटॅक, राजकीय वर्तुळात शोकाकूल वातावरण

Malaria : मलेरियाची लक्षणे दिसताच अजिबात करू नका दुर्लक्ष; लगेच करा 'हे' काम, नाहीतर

SCROLL FOR NEXT