Marathi-Gujarati Dispute Saam Tv News
मुंबई/पुणे

मुंबईत मराठी - गुजराती वाद, परप्रांतियाकडून मराठी तरूणाला मारहाण; VIDEO व्हायरल

Marathi-Gujarati Dispute: बोरीवलीच्या आयसी कॉलनीतील हॅपी होम सोसायटीत मराठी-गुजराती वाद चिघळला. गुजराती व्यक्तीने मराठी रहिवाशाला मारहाण केल्याचा आरोप. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र वाद पोलिसांसमोरही सुरूच.

Bhagyashree Kamble

  • बोरीवलीच्या आयसी कॉलनीतील हॅपी होम सोसायटीत मराठी-गुजराती वाद चिघळला.

  • गुजराती व्यक्तीने मराठी रहिवाशाला मारहाण केल्याचा आरोप.

  • पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र वाद पोलिसांसमोरही सुरूच

  • मनसे कार्यकर्त्यांचा हस्तक्षेप, परिसरात खळबळ.

गेल्या काही महिन्यांपासून मराठी अमराठी वाद पेटला आहे. घाटकोपर आणि मिरा-भाईंदरनंतर आता बोरीवलीतही हा वाद चिघळला आहे. बोरीवलीतील एका सोसायटीत गुजराती व्यक्तीने मराठी रहिवाशाला बेदम मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.

हा प्रकार बोरीवलीतील आयसी कॉलनीतील 'हॅपी होम सोसायटी'त घडला. येथे एका गुजराती आणि मराठी कुटुंबामध्ये वाद निर्माण झाला. या वादात गुजराती व्यक्तीने मराठी व्यक्तीला मारहाण केल्याचा आरोप आहे. हाणामारीनंतर वाद अधिकच विकोपाला गेला आणि काही वेळातच शाब्दिक चकमकी सुरू झाल्या.

पोलिसांनी सोसायटीत पोहोचून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांसमोरही दोन्ही गटाकडून वाद सुरूच होता. घटनेची माहिती मनसे कार्यकर्त्यांना देण्यात आली आणि ते काही क्षणांतच घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

मिरा भाईंदरमधील मराठी अमराठी वाद

मिरा भाईंदरमध्ये मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या दुकानदाराला मनसे पदाधिकाऱ्यांनी मारहाण केली होती. यानंतर मनसे पदाधिकाऱ्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेच्या निषेधार्थ शहरातील व्यापारी संघटनांनी दुकाने बंद ठेवून मोर्चा काढला होता. दरम्यान, त्यानंतर मनसैनिकांसह मराठी माणसांनी मिळून मिरा भाईंदरमध्ये भव्य मोर्चा काढला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Irrfan Khan Birth Anniversary : इरफान खानने वाचवला होता जीव; आज 'तो' आहे IPS ऑफिसर, नेमका किस्सा काय?

Hairstyle Ideas: मकर संक्रांतीला काळ्या साडीवर खुलून दिसतील 'या' 5 हेअरस्टाईल्स; पारंपारिक लूकला मिळेल मॉडर्न टच

Deepika Padukone : चाहत्याच्या आईने पुरणपोळी आणली अन् दीपिकाने थेट...; VIDEO मधील साधेपणा पाहून नेटकरी भारावले

Maharashtra Live News Update: आज पुण्यात अजित पवारांचा रोड शो

Nashik Politics: मोठी बातमी! नाशिकमध्ये भाजपला मोठं खिंडार, एकनाथ शिंदेंनी ३ बडे नेते फोडले

SCROLL FOR NEXT