Mumbai Borivali Accident News
Mumbai Borivali Accident News Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai News : मुंबईतील खड्ड्यांनी घेतला दोघांचा बळी; मन हेलावून टाकणारी घटना

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : मुंबईसह (Mumbai) उपनगरात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलंय. त्यातच रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताच्या (Accident) घटना घडत आहेत. अशीच एक अपघाताची घटना मुंबईतील वेस्टन एक्सप्रेस हायवेवर घडली. बोरिवली जवळच्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांनी दोन जणांचा बळी घेतला. (Mumbai Borivali Todays News)

मृतांमध्ये एक महिला आणि एक पुरुषाचा समावेश आहे. या घटनेमुळे मुंबईमध्ये खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दोन जणांचा जीव गेल्याने आता तरी प्रशासनाला जाग येणार, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

नेमकं काय घडलं?

प्राप्त माहितीनुसार, बोरिवली वेस्टन एक्सप्रेस हायवेवर दोघे जण बाईकवरून बांद्राकडून दहिसर चेक नाकाकडे जात होते. संजय नॅशनल प्रा येथील ब्रीजवरील खड्ड्यांमुळे बाईक आदळली आणि दोघेही खाली पडले. त्याचवेळी पाठीमागून भरधाव वेगात ट्रक येत होता. या ट्रकने दोघांनाही चिरडलं. (Borivali Accident Todays News)

या घटनेनंतर पोलिसांनी ट्रकचालकाला ताब्यात घेतलं आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान या सर्व प्रकारामुळे मुंबईतील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पावसाळ्यात खड्ड्यांचा प्रश्न अधिकच गंभीर होतो.

पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज लागत नाही. त्यामुळे असे अनेक अपघात होतात. परिणामी नाहक बळी जातात. या घटनेमुळे आणखी किती बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार आहे, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले; पर्यटक आणि भाजपच्या नेत्यावर गोळीबार

Relationship Tips: लग्नाआधी भावी जीवन साथीदाराला विचारा 'हे' ३ प्रश्न; नाहीतर आयुष्यात येतील दुःख

Chandu Champion Trailer: कार्तिक आर्यनच्या चित्रपटाचा 'चॅम्पियन' ट्रेलर रिलीज

ED कडून थेट अटक करण्यावर आता बंधनं, PMLA वर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

RCB vs CSK IPL 2024 : बेंगळुरूची प्लेऑफमध्ये एन्ट्री पक्की; चेन्नई आयपीएलमधून बाहेर

SCROLL FOR NEXT