Mumbai Bomb Threat Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Bomb Threat: मुंबईवर दहशतवादी हल्ल्याच्या धमकीमागची इनसाइड स्टोरी खतरनाक, सगळेच चक्रावून गेले

Mumbai Police: मुंबईमध्ये गणेश विसर्जनाच्या दिवशी बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली होती. धमकी देणाऱ्याला पोलिसांनी नोएडा येथून अटक केली. आरोपीने चौकशीदरम्यान धक्कादायक खुलासा केला.

Priya More

मुंबईमध्ये गणपती विसर्जनादरम्यान बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी अटक केली. आरोपीने मुंबईच्या वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअपवर धमकीचा मेसेज पाठवला होता. या प्रकरणी चौकशी करत असताना आरोपीने मोठा खुलासा केला. मित्राला धडा शिकवण्यासाठी त्याने त्याच्या नावाने धमकीचा मेसेज पाठवला असल्याचे त्याने सांगितले.

उत्तर प्रदेशच्या नोएडाच्या ५१ वर्षीय अश्विनी कुमारला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याने दहशतवादी असल्याचे सांगत मुंबई बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी दिली होती. आरोपी बिहारच्या पाटणामध्ये राहणारा आहे. गेल्या ५ वर्षांपासून तो नोएडामध्ये राहतो. तो ज्योतिष असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी त्याच्याकडून ७ मोबाईल, ३ सिमकार्ड, एक एक्सटर्नल स्लॉट, ६ मेमरी कार्ड होल्डर, २ डिजिटल कार्ड आणि ४ सिम कार्ड होल्डर जप्त केले. अटकेनंतर आरोपीला पोलिस मुंबईमध्ये घेऊन आले.

गुरुवारी रात्री उशिरा वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअपवरएक संदेश आला की, मुंबईत ३४ मानवी बॉम्ब ठेवण्यात आले आहेत आणि १४ पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसले आहेत. या मेसेजमध्ये असेही म्हटले होते की, ४०० किलो आरडीएक्स वापरला जाईल. गणेश विसर्जनापूर्वी ही धमकी देण्यात आल्यामुळे मुंबईत खळबल उडाली होती. मुंबई पोलिस अलर्ट मोडवर आले होते. या धमकीनंतर पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था कडक केली आणि शहरात हाय अलर्ट जारी केला.

तपासात धक्कादायक माहिती समोर आली. अश्विनी कुमारने त्याचा मित्र फिरोजच्या नावाने धमकीचा मेसेज पाठवला होता. पैशाच्या व्यवहारावरून दोघांमध्ये भांडण झाले होते. याच रागातून त्याने हे कृत्य केले. फिरोजने पाटण्याच्या फुलवारी शरीफ पोलिस ठाण्यात अश्विनीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. ज्यामुळे अश्विनीला तीन महिने तुरुंगात राहावे लागले. या वैमनस्यातून त्याने फिरोजच्या नावाचा वापर करून धमक्या दिल्या जेणेकरून पोलिसांनी त्याला अटक करावी.

मुंबई पोलिसांनी सांगितले की, 'आरोपीने स्वतःला 'लष्कर-ए-जिहादी' या दहशतवादी संघटनेचा सदस्य असल्याचे सांगून धमकी दिली. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की त्याचा हेतू दहशत पसरवण्याचा नव्हता तर त्याच्या मित्राला अडकवण्याचा होता.' मुंबई पोलिसांनी आरोपीला नोएडातून अटक करत मुंबईमध्ये आणले आहे. त्याची चौकशी सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : शाळेत ११ वर्षीय विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, मुख्याधापकाचं हैवानी कृत्य उघड

भव्य विसर्जन मिरवणुकीत बाप्पावर फुलांचा वर्षाव; पाहा डोळ्यांची पारणं फेडणारं दृश्य|VIDEO

Anant Chaturdashi 2025 live updates : माजीं खासदरनवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्याकडून गणरायाचे विसर्जन

Marriage Tips : नवरा-बायकोचं नातं तुटण्यापूर्वी व्हा सावध; या गोष्टींमुळे वाढतो घटस्फोटाचा धोका

Ashane Waterfall : रायगडचे सौंदर्य वाढवणारा 'आषाणे' धबधबा, तुम्ही कधी पाहिला का?

SCROLL FOR NEXT