Mumbai : खेळण्यासाठी बाहेर गेला तो घरी परतला नाही; वर्सोवा पोलिसांच्या तत्परतेने हरवलेला मुलगा सुखरूप

Mumbai News : सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास कार्तिक घराबाहेर खेळण्यासाठी गेला होता. मात्र घरी परतताना रस्ता चुकल्याने तो घरी परतला नाही. मुलगा घरी न आल्याने घरच्यांनी सर्वत्र शोध घेतला
Mumbai News
Mumbai NewsSaam tv
Published On

गणेश गाडगे 
मुंबई
: घरात आईला सांगून खेळण्यासाठी घराबाहेर गेला. घरी येताना रस्ता विसरला आणि भरकटून गेला. बोलता येत नसल्याने त्याला काही सांगता देखील येईना; यामुळे मुलगा घरी न आल्याने घरातील मंडळी चिंतेत सापडले होते. पोलिसात हरविल्याची तक्रार दाखल केली असता वर्सोवा पोलिसांनी तत्परता दाखवून हरविलेल्या अल्पवयीन मुलाचा शोध घेत कुटुंबाच्या स्वाधीन केले. 

मुंबईच्या वर्सोवा पोलीस स्टेशन हद्दीत हा प्रकार घडला असून कार्तिक दिलीप कामत (वय १०) असे हरविलेल्या या मुलाचे नाव आहे. दरम्यान कार्तिकला बोलता येत नाही. मात्र ३१ ऑगस्टला सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास कार्तिक घराबाहेर खेळण्यासाठी गेला होता. मात्र घरी परतताना रस्ता चुकल्याने तो घरी परतला नाही. मुलगा घरी न आल्याने घरच्यांनी सर्वत्र शोध घेतला. मात्र कार्तिक कोठेही आढळून आला नाही.  

Mumbai News
Nashik Crime : मैत्रिणीची छेड काढल्याचा संशय; भिकाऱ्याच्या डोक्यात दगड घालून केली हत्या

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध 

मुलगा सापडत नसल्याने अखेर त्याच्या वडिलांनी वर्सोवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. मुलगा हरविल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक साधने व सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने शोधमोहीम हाती घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपशिखा वारे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. थेटे, पो.नि. दाभोळकर, पो.उप.नि. निकम, पो.ह. पवार आणि पो.शि. इनामदार यांनी तत्परतेने काम करून कार्तिकचा शोध घेतला. 

Mumbai News
Shirpur News : अवैध सावकारी फोफावली; एकाच वेळी पाच ठिकाणी पोलिसांची छापेमारी

मुलाला दिले पालकांच्या ताब्यात 

पोलिसांनी मुलाचा शोध घेत अखेर मुलगा सुखरूप सापडला. यानंतर त्याला पालकांच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला. पोलिसांच्या तत्परतेने मुलगा सुखरूप सापडला आहे. जेथे शब्द थांबतात, तेथे पोलिसांचे कर्तव्य बोलते," या वाक्याला साजेसा आदर्श दाखवत वर्सोवा पोलिसांनी मानवतावादी कार्याची उत्कृष्ट बाजू पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com