Shirpur News : अवैध सावकारी फोफावली; एकाच वेळी पाच ठिकाणी पोलिसांची छापेमारी

Dhule News : पाच अवैध सावकारी करणाऱ्यांच्या घरी छापेमारी करत घरझडती घेण्यात आली. यातील काही अवैध सावकारांच्या घरी, वेगवेगळ्या डायरी, कोरे चेक, पावत्या, स्टॅम्पसह इतर दस्तावेज मिळून आले
Shirpur News
Shirpur NewsSaam tv
Published On

धुळे : अवैधरीत्या सावकारी करण्याचे प्रमाण वाढले आहे. याची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक निबंधक आणि पोलिसांनी छापेमारी करत कारवाई केली आहे. शिरपूर तालुक्यात एकाच वेळी पाच ठिकाणी अचानक छापेमारी केल्याने जिल्हाभरातील अवैधरीत्या सावकारी करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. 

धुळ्याच्या शिरपूर तालुक्यात हि कारवाई करण्यात आली आहे. शिरपूरचे सहाय्यक निबंधक आणि शिरपूर पोलिसांना प्राप्त झालेल्या तक्रारी नुसार तक्रारदाराने पाच जणांकडून एकुण ९ लाख ९५ हजार रुपये व्याजाने घेतले होते. या पैशांची परतफेड करुन देखील पैशांसाठी तक्रादराकडे घरी जाऊन अवैध सावकार तगादा लावत होते. वारंवार होत असलेल्या या त्रासाबाबत पोलिसात तक्रार दाखल केली होती.   

Shirpur News
Bus Accident : शालेय विद्यार्थ्यांनी भरलेली बस उलटली; ३० विद्यार्थी जखमी, तीन जण गंभीर

पाच पथकांद्वारे एकाच वेळी छापेमारी 

यातील काही अवैध सावकारांनी दहा टक्क्यांनी पैसे घेतल्याचे देखील तक्रारदाराने म्हटले आहे. या घटनेनंतर पोलीस आणि साहाय्यक निबंधक यांच्यावतीने पाच पथके बनवून एकाच वेळेला पाच अवैध सावकारी करणाऱ्यांच्या घरी छापेमारी करत घरझडती घेण्यात आली. यातील काही अवैध सावकारांच्या घरी, वेगवेगळ्या डायरी, कोरे चेक, पावत्या, स्टॅम्पसह इतर दस्तावेज मिळून आले आहेत. हे सर्व साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.  

Shirpur News
Nashik Crime : मैत्रिणीची छेड काढल्याचा संशय; भिकाऱ्याच्या डोक्यात दगड घालून केली हत्या

सावकारांचे धाबे दणाणले 

दरम्यान धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध सावकारी सुरु असल्याचे समोर आले आहे. यातच शिरपूर तालुक्यात एकाच वेळी पाची ठिकाणी धाडी टाकत अचानक घराची झाडाझडती झाल्याने अवैधरीत्या सावकारी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. अर्थात यासंदर्भात अवैध सावकारीचा मुद्दा पुन्हा उपस्थित झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com