Mumbai Politics  Saam tv
मुंबई/पुणे

मुंबईत मोठा राडा; ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची हाणामारी, नेमकं काय घडलं?

ghatkopar political news : मतदानाच्या आदल्यादिवशी मुंबईत मोठा राडा झाला. ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्त्यांची हाणामारी झाल्याचीही घटना घडली.

Vishal Gangurde

मुंबईत मतदानाच्या आदल्या दिवशी मोठा राडा

घाटकोपरमध्ये शिंदे आणि ठाकरे गटात मोठा राडा

घटनेने घाटकोपरमध्ये एकच खळबळ

मयूर राणे, साम टीव्ही

मुंबई महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी शेवटचा एक दिवस आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर आणि उपनगरातही राजकीय वातावरण तापलं आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मतदानाच्या आदल्या दिवशी काही ठिकाणी पैसे वाटपाचे आरोप केले जात आहेत. घाटकोपरमध्येही दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते पैसे वाटपावरून भिडले. या घटनेने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

मुंबईतील घाटकोपरमध्ये शिंदे पक्षाकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोपावरुन वाद झाला. यावेळी ठाकरे आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीची घटना घडली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात शिंदे गटाच्या काही लोकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र, शिंदे गटाचे माजी नगरसेवक हारुन खान यांनी ठाकरे गटाचे पदाधिकारी इम्रान शेख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

हारुन खान यांनी आरोप केले आहेत की, इम्रान खान बाहेरून गुंड घेऊन आला आहे. या गुंडांनी हत्येचे गुन्हे देखील केले आहेत. त्याचे मोठ्या मोठ्या गुंडांसोबत फोटो आहेत. तो गुन्हेगार असून त्यांनीच कालचं प्रकरण घडवून आणलंय'.

शिंदे गटाच्या आरोपांना ठाकरे गटाच्या इम्रान शेख यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. इम्रान शेख यांनी म्हटलं आहे की, 'आमच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप खोटे आहेत. शिंदे गटाचे हरून खान हे विभागातील लोकांना धमकावत आहे की, मला मतदान नाही केलं तर तुमची घर पाडले जाईल.तुमचे पाणी बंद केले जाईल'. ठाकरेंच्या शिवसेनेच्या इम्रान शेख यांनी केलेल्या आरोपांना शिंदे गटाकडून काय प्रत्युत्तर दिलं जाईल, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : दहावी-बारावी परीक्षेत कॉपी करणाऱ्या ४३ विद्यार्थ्यांवर कारवाईचे संकेत

Fire Accident : अग्निकांड! कार चार्जिंगवेळी शॉर्ट सर्किट, ४ सिलिंडरचा स्फोट, ७ जणांच मृत्यू

Gudi Padawa 2026: मराठी नववर्षाची सुरुवात; गुढी किती वाजता उभारायची? शूभ मुहूर्त काय? पंचांगकर्ते दातेंनी दिली सर्व माहिती

Heart Disease Risk: कोलेस्ट्रॉल रिपोर्ट नॉर्मल, तरीही हार्ट अटॅकचा धोका? डॉक्टरांनी सांगितला हा दुर्लक्षित घटक ठरतोय विलन

Breakfast Recipe : नाश्ता बनवायला कंटाळा आलाय? मग उरलेल्या चपात्यांपासून करा 'ही' चटपटीत रेसिपी

SCROLL FOR NEXT