Mumbai BKC Pod Taxi News Saam Tv
मुंबई/पुणे

POD Taxi : मुंबईत लवकरच सुरू होणार 'पॉड टॅक्सी', वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार; कुठून कुठे धावणार?

Mumbai BKC POD Taxi News : बीकेसीतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कुर्ला आणि वांद्रे स्थानकांदरम्यान लवकरच पॉड टॅक्सी सेवा सुरू करण्यात येणार आहे. यासाठी आज देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येणार आहे.

Alisha Khedekar

  • बीकेसी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पॉड टॅक्सी

  • कुर्ला-वांद्रे मार्गावर ड्रायव्हरलेस सेवा

  • मेट्रो लाईन ९ आणि ३ चे उद्घाटन

  • प्रवाशांसाठी जलद आणि सोयीस्कर प्रवास

बीकेसीमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी कुर्ला रेल्वे स्थानक आणि वांद्रे रेल्वे स्थानकावरून पॉड टॅक्सी सेवा सुरु करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमी पूजन कऱण्यात येणार आहे. पॉड टॅक्सी सेवेमुळे प्रवाशांचा प्रवास जलद होणार आहे. याचा सर्वात मोठा फायदा नोकरदारवर्गाला होणार आहे.

वाढत्या शहरीकरणामुळे प्रवाशांना वाहतूक कोडींचा सामना करावा लागत आहे. यामुळे कामाच्या ठिकाणी पोहचण्यासाठी नोकरदार वर्गाला त्रास सहन करावा लागतो. यावरती उपाय म्हणून प्रवाशांच्या सेवेत आता पॉड टॅक्सी येणार आहे. 'पॉड टॅक्सी' ड्राइवर शिवाय चालणार वाहन आहे. या टॅक्सीमध्ये एका वेळी ८ प्रवासी बसून आणि १३ उभे राहून प्रवास करू शकतात. या पॉड टॅक्सी सेवेचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमी पूजन कऱण्यात येणार आहे. यावेळेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत.

आज पॉड टॅक्सीसोबत काशीगाव आणि दहिसर दरम्यान मेट्रो लाईन ९ आणि डायमंड गार्डनर ते मंडाले मेट्रो ३ या लाईन्सच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे. मेट्रो ९ ही मुंबई मेट्रो प्रकल्पातील महत्त्वाची लाईन आहे. ही लाईन मेट्रो 7 ला जोडली असल्याने प्रवाशांना आता थेट अंधेरीपर्यंत जाता येणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मेट्रो मार्गिका सुरू करण्याची तयारी पूर्ण केली असून आता गुंदवली ते काशिगाव दरम्यान थेट प्रवास शक्य होणार आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाकरेंचे खासदार फोडण्यात फडणवीसांचा हात? MPच्या बंडखोरीस जबाबदार कोण? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ऑपरेशनचं राजकारण

Maharashtra Live Update: सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकर भरतीला स्थगिती

Friday Horoscope: प्रेमात नवा रंग, पैशांचा वर्षाव; या ५ राशींना मिळणार चांगली बातमी, वाचा शुक्रवारचे राशीभविष्य

Blood Pressure : सकाळी की रात्री? BP ची गोळी कधी घेतल्याने जास्त फायदा होतो, जाणून घ्या

Pune Crime: जमिनीच्या वादातून शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखाकडून गोळीबार; पिस्तूल, ४ जिवंत काडतुसे जप्त

SCROLL FOR NEXT