Bhayandar Crime News Saam tv
मुंबई/पुणे

Bhayandar Crime News :समुद्रकिनारी बॅगेत सापडला महिलेचा शिर नसलेला मृतदेह; हातावर त्रिशूल टॅटू

Bhayander West Crime: कोणाच्या कुटुंबातील २५ ते ३० वर्षीय महिला मिसिंग असल्यास त्यांनी उत्तन सागरी पोलीस ठाण्यास संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आले आहे.

चेतन इंगळे

Bhayandar Crime News: मुंबई भाईंदर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भाईंदर पश्चिमेला उत्तन परिसरात उत्तन पातानच्या समुद्र किनाऱ्यावर एका बॅगमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच उत्तन सागरी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. (Latest Marathi News)

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, भाईंदर (Bhyandar) पश्चिमेला उत्तन परिसरात समुद्र किनाऱ्यावर एका एल्फा कंपनीच्या ट्रॅव्हल बॅगेत महिलेचा शीर नसलेला मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच उत्तन सागरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

बॅगेत असणारा शीर नसलेला मृतदेह २५ ते ३० वर्षीय महिलेचा आहे. तिच्या हातावर त्रिशूल व ओम चित्र असलेला टॅटू गोंदवलेला आहे. मृतदेह असलेली बॅग पाण्यात वाहून आलेली असून नेमकी कुठून आली आहे याबाबतचा तपास पोलीस घेत आहेत. (Crime News)

महिलेच्या हत्ये मागील कारण काय? अशी भयंकर हत्या कोणी व कुठे केली असावी? अशा अनेक प्रश्नांची उकल करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. त्याबाबत पोलीस शोध घेत असून लवकरात लवकर हत्या करणाऱ्याचा शोध घेतला जाईल असे उत्तन सागरी पोलीस ठाण्याचे वपोनी कारांडे यांनी सांगितले आहे.

तसेच यावेळी कोणाच्या कुटुंबातील २५ ते ३० वर्षीय महिला मिसिंग असल्यास त्यांनी उत्तन सागरी पोलीस ठाण्यास संपर्क साधावा असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त नांदेड शहरातील श्री नरहरी नरसिंह मंदिरात विठ्ठल नामाचा गजर

Pune: पंढरीच्या वाटेवर लुटमार अन् अल्पवयीन मुलीचे लचके तोडले; पोलिसांनी २ आरोपींच्या मुसक्या आवळल्या

Shahada Police : प्रायव्हेट खोल्या, सोफ्यावर कंडोम; शहाद्यात अवैध कॅफेवर पोलिसांचा छापा

अमेरिकेत पुराचा हाहाकार! 50 जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; पाहा VIDEO

Mahadev Temple: शिवमंदिरात महिलांनी केव्हा जावे? जाणून घ्या योग्य वेळ

SCROLL FOR NEXT